esakal | २२५ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी झाली प्रसिद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Gram Panchayat Election, Final Voter List of 225 Gram Panchayats has been published

 जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्ध केली. मतदार यादीसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती जिल्ह्यातील संबंधित सातही तहसील कार्यालयामार्फत निकाली काढण्यात आल्या आहेत.

२२५ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी झाली प्रसिद्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

 अकोला :  जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्ध केली. मतदार यादीसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती जिल्ह्यातील संबंधित सातही तहसील कार्यालयामार्फत निकाली काढण्यात आल्या आहेत.

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत राज्यातील सुमारे ४ जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी संंबंधित तालुक्यात तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. तहसील कार्यालये, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाला मिळाला आहे.

loading image