esakal | ग्रामपंचायत निवडणूक; पहिल्या दिवशी सात उमेदवारी अर्ज, सुटीच्या दिवशी स्विकारले जाणार नाहीत नामनिर्देशनपत्रे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Gram Panchayat elections; Seven nomination papers on the first day, nomination papers will not be accepted on holidays

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. इच्छुकांच्या दस्तऐवज गोळा करण्याची धावपळच सुरू असल्याने जिल्ह्यात तेल्हारा व बाळापूर वगळता इतर तालुक्यात उमेदवारी अर्जांची संख्या पहिल्या दिवशी निरंक होती.

ग्रामपंचायत निवडणूक; पहिल्या दिवशी सात उमेदवारी अर्ज, सुटीच्या दिवशी स्विकारले जाणार नाहीत नामनिर्देशनपत्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. इच्छुकांच्या दस्तऐवज गोळा करण्याची धावपळच सुरू असल्याने जिल्ह्यात तेल्हारा व बाळापूर वगळता इतर तालुक्यात उमेदवारी अर्जांची संख्या पहिल्या दिवशी निरंक होती.

जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत बुधवार (ता. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. इच्छुक ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

बुधवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी कागदपत्र गोळा करण्यातच इच्छुकांचा वेळ गेला. त्यामुळे जिह्यात २२५ ग्रामपंचायतींसाठी केवळ सात अर्ज दाखल झाले. या सात अर्जांपैकी तेल्हारा तालुक्यात सहा तर बाळापूर तालुक्यात लोहारा ग्रामपंचायतसाठी एक अर्ज दाखल झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.

हेही वाचा -  एका तासात नववधूचा केला ऑनलाईन मेकअप

असा आहे निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया - २३ ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत
- उमेदवारी अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर २०२०
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी - ४ जानेवारी २०२१ पर्यंत
- निवडणूक चिन्ह वाटप - ४ जानेवारी २०२१ (दुपारनंतर)
- मतदान - १५ जानेवारी २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
- मतमोजणी १८ जानेवारी २०२१

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकन अर्जाचा डोक्याला ताप
नवीन बॅंक खाते मागितल्याने वाढली डोकेदुखी


उमेदवारी अर्जांची स्थिती
तालुका ग्रा.पं. संख्या अर्जांची संख्या
तेल्हारा ः ३४ ०६
अकोट ः ३८ ००
मूर्तिजापूर ः २९ ००
अकोला ः ३६ ००
बाळापूर ः ३८ ०१
बार्शीटाकळी ः २७ ००
पातूर ः २३ ००
एकूण ः २२५ ०७ 

(संपादन - विवेक मेतकर)

loading image