बापरे! अन्न व प्रशासनाच्या कार्यालयातून चोरी गेला सहा लाखाचा गुटखा, वर्षभरानंतर चोर पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 26 November 2020

बहुचर्चित बुलडाणा येथील शासकीय प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला गुटखा चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता.

बुलडाणा  : बहुचर्चित बुलडाणा येथील शासकीय प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला गुटखा चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता.

याप्रकरणी अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. सदर चोरीची तक्रार शहर पोलिस स्टेशनला केल्यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, वर्षभरानंतर याप्रकरणी आरोपींना पकडण्यात एलसीबीला यश आले आहे.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

प्रशासकीय इमारतीत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील विविध कारवाईत जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा ठेवण्यात येतो. सदर जप्त करण्यात आलेला गुटखा हा १० व ११ डिसेंबर २०१९ च्या मध्यरात्री दरम्यान दरवाजाचे कुलूप तोडून चोरीला गेल्या प्रकार घडला होता.

याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला तत्कालीन सहाय्यक आयुक्त अनिल राम राठोड यांनी तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, १३ फेब्रुवारी २०२० ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -  अकोला, वाशीम जिल्ह्यात बसविणार ‘डमी वॉर टँक

सदर गुन्ह्यातील आरोपी हे चिखली येथील रहिवासी असल्याचे गोपनीय सूत्रांच्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळिराम गिते यांना कळताच त्यांनी शोधकामी एक पथक तयार करुन तपास सुरू केला.

पथकाने गोपनीय माहिती काढून २४ नोव्हेंबरला गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद तौफिक मोहम्मद रफिक याला ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्ह्यासंदर्भाने विचारपूस केली. त्यावेळी सदर गुन्ह्यात सहआरोपी म्हणून सय्यद समीर सय्यद जहीर (वय २१ वर्ष, रा. गोरक्षणवाडी चिखली, अक्षय राजू अवसरमोल (वय १९ वर्ष, रा. गोरक्षणवाडी चिखली, शेख बिलाल शेख रब्बानी, विशाल दांडगे, काला आसिफ यांच्यासह केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद तौफिक मोहम्मद रफिक (वय २४, रा. बागबान गल्ली चिखली, अक्षय राजू अवसरमोल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्ह्यातील शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा किंमत २ लाख ३४ हजार, गुन्ह्यात वापरलेली पिकअप वाहन एमएच २८ एबी २३१३ किंमत ३ लाख तसेच दुचाकी क्रमांक एमएच २८ बीजी ५०९९ किंमत ५० हजार असा एकूण ५ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी सै. समीर सै. जहीर याला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींकडून जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी बुलडाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनात पोनि बळिराम गीते, सपोनि नागेशकुमार चतरकर, पोहेका सय्यद हारुन, अताउल्ला खान, पोना लक्ष्मण कटक, पोका प्रवीण पडोळ, श्रीकांत चिंचोले, रवि भिसे, शहजाद यांनी केली.

 त्या अधिकाऱ्यांची झाली उचलबांगडी
याप्रकरणी अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर दोन आढळलेल्या अधिकार्‍यांविरोवधात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येऊन याच विभागातील अधिकार्‍यांचाही उचलबांगडी झाली होती. यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Gutka worth Rs 6 lakh stolen from Food and Administration office, thief in police custody after a year