रुग्णवाहिका त्यांच्या बापाची आहे का? - आरोग्य मंत्री राजेश टोपे 

Akola News: The health minister listened to the complaints of the common people
Akola News: The health minister listened to the complaints of the common people

जऊळका (जि.वाशीम) :  येथील कोरोना झालेल्या व्यक्तीना उपचारासाठी पाठविण्यात आले.पण त्यांच्या कुटूंबाला  ला खरतर स्वॅब देण्यासाठी कालच जायचं होतं पण आरोग्य यंत्रणेने वाहन पाठविले नाही. याबाबत आरोग्य अधिकार्याने दिलेल्या उर्मट उत्तराची कैफियत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऐकून रूग्णवाहिका आरोग्य अधिकार्यांच्या बापाची आहे काय असे संतप्त उद्गार काढले. 
  जऊळका येथे एक रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला होता 


त्याच्या कुटुंबियांना आरोग्य तपासणी करण्यासाठी नेण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे.मात्र एक दिवस उलटूनही आरोग्य विभागाने कोणतीच दखल घेतली नाही. याबाबत येथील नागरिक गोपाल व्यास यांनी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.बोरसे यांच्याशी संपर्क साधावा होता  मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोरसे त्यांनी उद्धट भाषेत उत्तर दिले  

आमची रुग्णवाहिका खराब होते?तुम्ही तुमच्या इथली घेऊन जा आशा भाषेत डॉ. बोरसे यांनी उर्मटपनाणे बोलून टाळून दिले. यावरून स्पष्ट होते की आरोग्य यंत्रणा किती स्थिर आहे.याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोरसे यांनी केलेल्या  उद्धट वागणुकीची ऑडियो क्लिप पाठवली असता आरोग्य मंत्री राजेश टोपे हे बोलतांना म्हणाले जी वागणूक डॉ. बोरसे नी दिली ती चुकीची आहे.आरोग्य यंत्रणा आपल्या साठी आहे आणि राहला विषय रुग्णवाहिकेचा तर ती त्यांच्या बाप्पाची नाही आहे? अशी ठाम प्रतिक्रिया आरोग्य मंत्री यांनी दिली.

आशा कामचुकार अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवावी जेणे करून कोरोना मध्ये स्वतः वर आलेली जबाबदारी चे घोंगडे झटकणारे आरोग्य अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे जेणे करून नागरिकांना चांगली वर्तणूक मिळेल

.तालुका आरोग्य अधिकारी एवढ्यावरच नाही थांबले तर तुम्ही माझी वरिष्ठांनकडे तक्रार केली.तुम्हाला काही अधिकार नाही मीपण तुमची तक्रार करणार जर माझ्यावर कार्यवाही झाली तर चक्क तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोरसे यांनी  गोपाल व्यास यांना दमदाटी केली. तरी त्वरित आरोग्य मंत्री साहेबांनी याची दखल घेऊन अशा कामचुकार व उद्धट उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com