जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटसक्तीचा निर्णय पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घेतला आहे.
अकोला जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात रोखून अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. येत्या शुक्रवारपासून सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.
अकोला : जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटसक्तीचा निर्णय पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घेतला आहे.
अकोला जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात रोखून अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. येत्या शुक्रवारपासून सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अपघातात नागरिकांचा हकनाक बळी जातो त्यापैकी ८० टक्के मृत्यू हे डोक्यावर जबर दुखापत लागल्यानेच होत असल्याचे दिसून येते, अशा वेळी हेल्मेट परिधान केल्यास जीव वाचू शकतो,
अश्यातच सर्वोच्च न्यायालय यांनी दरवर्षी १० टक्के अपघातात कमी करण्याचे निर्देश परिवहन मंत्रालय यांना दिले असून, प्राणांतिक अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट दिल्याने त्या अनुषणगाने उपाय योजण्याच्या सूचना सर्व संबधितांना देण्यात आल्या आहेत.
हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन
सर्वसामान्य दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे, विना हेल्मेट चालकांवर येत्या शुक्रवारपासून शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली. सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)