esakal | आयआयटीच्या कोविड किट्‌सला आयसीएमआरची मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

akola news ICMR accredits IIT's Kovid Kitras

कोविड रुग्णाच्या तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्‌स आयआयटी दिल्लीच्या संशोधनांनी तयार केली. त्यांना भारतीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. या कोविड किट्‌चे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी (ता.15) अकोला येथून ऑनलाईन केले.

आयआयटीच्या कोविड किट्‌सला आयसीएमआरची मान्यता

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला  ः कोविड रुग्णाच्या तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्‌स आयआयटी दिल्लीच्या संशोधनांनी तयार केली. त्यांना भारतीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. या कोविड किट्‌चे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला येथून ऑनलाईन केले.


केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी याबद्दलची माहिती देतांना सांगितले की, कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे कोविड चाचणी व तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कोविड किट तयार केली असून याची किंमत फक्त 399 रुपये आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

याला लागणारा इत्तर खर्च मिळून या किटची किंमत फक्त 650 रुपये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड टेस्ट होवून कोविडचे संक्रमणाचा फैलवावर प्रतिबंध होवू शकतो. यासाठी कोरोश्‍योर या कंपनीसह सहा कंपनींनी परवाना घेतले असून, या कंपनींने 1 लाख किट्‌सचा मागे पाच हजार किट्‌स शासनाला मोफत देण्याचे अभिवाचन दिले आहे. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट्‌स निर्धारीत वेळेत तयार झाली असून, हे एक क्रांतीकारी काम असल्याचे त्यांनी सांगून सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येवून आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करून घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी यावेळी केले.

(संपादन - विवेक मेतकर)