ग्रुप ॲडमीनसाठी महत्वाची सुचना....राम मंदिर उभारणीचा उद्घाटन सोहळ्यानिमित्त सोशल मीडियावर होतेय व्हायरल

विवेक मेतकर
Tuesday, 4 August 2020

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत. अवघी अयोध्या नगरी सजवण्यात आली असून अवघ्या देशाच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त सोशल मीडियावरील व्हाट्ॲप ग्रृप्सवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिस असा उल्लेख करून ही पोस्ट भराभर वेगवेगळ्या गृप्समध्ये फिरत आहे.

अकोला  ः राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत. अवघी अयोध्या नगरी सजवण्यात आली असून अवघ्या देशाच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त सोशल मीडियावरील व्हाट्ॲप ग्रृप्सवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिस असा उल्लेख करून ही पोस्ट भराभर वेगवेगळ्या गृप्समध्ये फिरत आहे.

काय आहे संदेश वाचा 
दिनांक 05/08/2020 रोजी  अयोध्या येथे राम मंदिर उभारणीचा उद्घाटन सोहळा आहे.  त्यासंदर्भात कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मेसेज व्हाट्सअप ग्रुपवरती पोस्ट होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यासंदर्भात कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मेसेज व्हाट्सअप ग्रुपवरती टाकल्यास संबंधित ग्रुप ॲडमिन व पोस्ट करणारे व्यक्तीवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे दिनांक 04/08/2020 ते दिनांक 07/08/2020 या कालावधीकरिता फक्त ग्रुप ॲडमिनच ग्रुप कंट्रोल करतील. तरी सर्व ग्रुप ॲडमीन यांनी फक्त admin ग्रुप कंट्रोल करतील. त्यासाठी त्यासाठी व्हास्टॲपवर सेटींग मध्ये जाऊन....
Group Info ✓

Group Setting ✓

Send Messages ✓

Only Admin ✓

असे बदल  करावेत. 
असा संदेश व्हायरल होत आहे. 

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवर सायबर विभागाचे लक्ष असून सायबर विभागाचे ई-पेट्रोलींग सुरू असल्याची माहिती आहे. ई-पेट्रोलींगच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट्सवर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Important Note for Group Admin .... Ram Mandir Construction Inauguration Ceremony Goes Viral On Social Media