दुधाळ जनावरे वाटपातील अनियमितता गाजणार, सत्ताधारी वंचितच घेणार पुढाकार

सुगत खाडे  
Monday, 24 August 2020

जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष घटक याेजनेंतर्गत दुधाळ जनावरे वाटप याेजनेत घाेळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.

 

अकोला : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष घटक याेजनेंतर्गत दुधाळ जनावरे वाटप याेजनेत घाेळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात दुधाळ जनावरे वाटप योजनेतील अनियमितता गाजण्याची दाट शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. पशुसंवर्धन विभागातर्फे लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात येते. योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी निकषांची चाळणी सुद्धा लावण्यात येते. यासाठी अर्जासाेबत आवश्यक दस्तावेजही लाभार्थ्यांकडून घेण्यात येतात. पशुसंवर्धन समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करते. काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने विशेष घटक याेजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे वितरण करण्यात आले. मात्र ही प्रक्रिया केवळ कागदाेपत्री राबविण्यात आली काय, असा सवाल तक्रारींद्वारे करण्यात येत असल्याने सदर प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Irregularities in the distribution of milch animals will be heard, the ruling party will take the initiative