सातपुड्याच्या पायथ्याशी गाव तलावाच्या पाण्यावर साडेबाराशे एकरावर होणार सिंचन

सदानंद खारोडे
Tuesday, 20 October 2020

त शासनाने कृषी विभागमार्फत गाव तलाव, पाझर तलाव, मागेल त्याला शेततळे आदी कामे केली आहेत. या कामामुळे सात गावातील साडे बाराशे एकरांवर सिंचन होऊ शकते. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल.

तेल्हारा (जि.अकोला)  :  त शासनाने कृषी विभागमार्फत गाव तलाव, पाझर तलाव, मागेल त्याला शेततळे आदी कामे केली आहेत. या कामामुळे सात गावातील साडे बाराशे एकरांवर सिंचन होऊ शकते. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल.

तेल्हारा तालुक्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचनाच्या योजना राबविण्यात आल्यात. आदिवासी भागातील धोंडा आखर, चिपीभीली, झरी बाजार, पिंपरखेड, बोरव्हा, रुपागड व हिवरखेड परिसरात गाव तलाव, पाझर तलाव, मागेल त्याला शेततळे, माती नाला गाळ काढणे, गाव तलाव चौपन, पाझर तलाव, तीन जुने सिमेंट नाला खोलीकरण आदी कामे झाली आहेत. यासह ९४ माती नाला बांध गाळ काढणे, मागेल त्याला शेततळे १४९ आदी एकूण ४६३ कामे झाली आहेत. या गाव तलावामध्ये २१६० टिसीएम पाणीसाठा झाला आहे.

त्यावर सातशे चौसष्ट एकर जमीन सिंचन होऊ शकते. पाझर तलावात १६० टीसीएम पाणी असून, त्यातून २६ एकर, जुने सिमेंट नाला बांध खोलिकरणातून ५६४ टीसीएम पाणी साठ्यातून एकशे अठ्यावीस एकर तर माती नाला बांध गाळ काढणे यातून जमा झालेल्या २८७ टीसीएम पाण्यावर ९६ हेक्टर सिंचन अपेक्षित आहे.

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत २४९ शेततळ्यांची कामे झाली आहेत. त्यामध्ये २९८ टीसीएम पाणी साचले असून, त्यातून १४५ हेक्टर जमिनीवर सिंचन केल्या जाऊ शकते. या कामांमुळे आदिवासी भागातील साडे बाराशे एकरांवर यावर्षी शेतकरी सिंचन करू शकतात.

सातपुड्याचा पायथा ‘रिचार्ज’
शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात पुन्हा जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून कामे केल्यास शेतकरी तलावामधून पाणी घेऊन पीक उत्पादन वाढवू शकतो. याहीपेक्षा अजून सातपुड्याच्या पायथ्याशी जलसंधारणाची कामे होऊ शकतात. होणाऱ्या जलसंधारण कामामुळे अजून खूप मोठ्या प्रमाणात सिंचन तसेच जमिनीतील भूजल पाण्याची पाणी पातळीमध्ये वाढ होईल. सातपुड्याचा पायथा हा पूर्णपणे रिचार्ज आहे.

सातपुडापर्वतामधून ५२ नदी-नाले वाहतात. पावसाळ्यात या नदी-नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. सदर पाणि अडविण्यासाठी शासनाने उपाय योजना केल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती सिंचन करू शकतात.
-दिलिप सागुंनवेढे, शेतकरी, खंडाळा

भूजल पातळी अत्यंत खोल गेल्यामुळे वाहूण जाणारे पाणी अडविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने यावर्षी प्रयत्न केले आहे व यापुढे सुरूच राहणार आहे.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Irrigation to be done on 1250 acres at village lake water at the foot of Satpuda