esakal | चेन्नईहून मुलगी पाहायला येणं पडलं महागात, निर्जनस्थळी बोलावून लावला 17 लाखांना चुना
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: It was expensive to see a girl from Chennai, scoundrels planted lime worth Rs 17 lakh

चेन्नईहून अकोल्यात मुलगी पहायला येणं चेन्नई येथील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. त्यांना मुलगी पाहायला बोलावणाऱ्या भामट्यांनी  मारहाण करत तब्बल 17 लाख लुटले. ही घटना मंगळवारी घडली.

चेन्नईहून मुलगी पाहायला येणं पडलं महागात, निर्जनस्थळी बोलावून लावला 17 लाखांना चुना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : चेन्नईहून अकोल्यात मुलगी पहायला येणं चेन्नई येथील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. त्यांना मुलगी पाहायला बोलावणाऱ्या भामट्यांनी  मारहाण करत तब्बल 17 लाख लुटले. ही घटना मंगळवारी घडली.

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र फिरवत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लुटमारीतील पावणेबारा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

चेन्नई येथील दिलीपकुमार जैन कुटूंबियांना मुलगी पाहण्यासाठी अकोल्यात या भामट्यांनी बोलावलं. सोमवारी हे कुटूंब अकोल्यात आलं होतं.

त्यांना मुलगी दाखविण्याच्या नावाखाली एमआयडीसी भागातील एका निर्जन स्थळी नेण्यात आलं. तिथे नेऊन त्यांना मारहाण करीत अंगावरील दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 17 लाखांचा ऐवज लुटण्यात आला.

या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल संध्याकाळी स्थानिक गुन्हे शाखेने अकोल्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. या अटकेनंतर अशाप्रकारे लोकांना फसविणारी मोठी टोळीच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(संपादन - विवेक मेतकर)