
शासनाने औद्यागिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रशिक्षण वर्गाना परवानगी दिली. परंतु, एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवासात मिळणाऱ्या सवलती सुरू न झाल्याने व अनेक भागात अद्यापही बस सेवा न सल्याने खासगी वाहनधारकांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक लुट सुरू आहे.
अकोला : शासनाने औद्यागिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रशिक्षण वर्गाना परवानगी दिली. परंतु, एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवासात मिळणाऱ्या सवलती सुरू न झाल्याने व अनेक भागात अद्यापही बस सेवा न सल्याने खासगी वाहनधारकांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक लुट सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मार्चमध्ये लाॅकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार देशभरातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉक ५ मध्ये गेल्या ७ महिन्यापासून बंद असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षण वर्गाना मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषगाने आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थी येण्यास सुरुवात झाली आहे.
परंतु, विद्यार्थ्याना एसटी बसमध्ये मिळणाऱ्या सवलती सुरू न झाल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. लाॅकडाउन पूर्वी एसटी पेक्षा कमी दर असल्याने व अनेक गावांमध्ये बस थांबत नसल्याने विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करीत होते.
खासगी वाहनाचे भाडे २० ते ३० रुपयांनी वाढले असल्याने प्रशिक्षणासाठी संस्थेत कसे यावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे. यामुळे एसटी बसमधे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती पुन्हा सुरू कराव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)