जवाहर नवोदय निवड चाचणी प्रवेश प्रक्रियेला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकारद्वारा आयोजित जवाहर नवोदय परीक्षा २०२१ ची प्रवेश प्रक्रिया काही प्रशासकीय कारणांमुळे वाढविण्यात आली आहे. आता ता.२९ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

पातूर (जि.अकोला) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकारद्वारा आयोजित जवाहर नवोदय परीक्षा २०२१ ची प्रवेश प्रक्रिया काही प्रशासकीय कारणांमुळे वाढविण्यात आली आहे. आता ता.२९ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

या परीक्षेला इयत्ता पाचवी शिकणारे विद्यार्थी पात्र राहतील. जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीकरिता निवड चाचणी परीक्षा शनिवार, ता.१० एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ता. २२ ऑक्‍टोबर ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत होती.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

ती आता ता. २९ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली असून, पातुर तालुक्यातील सर्व पालकांनी नोंद घ्यावी व आपल्या पाल्याची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी यु.एल. घुले, शिक्षण विस्तार अधिकारी कु. दीपमाला भटकर व साधन व्यक्ती संतोष राठोड यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Jawahar Navodaya selection test admission process extended till December 29