ग्रामपंचायतीचा अभिनव प्रयोग; नागरिकांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत कर वसुली

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 21 November 2020

नागरिकांकडून वसुली थकीत असल्याने ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना कर भरण्यासाठी सूचना केल्या.

कुरणखेड (जि.अकोला) :  नागरिकांकडून वसुली थकीत असल्याने ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना कर भरण्यासाठी सूचना केल्या.

त्यांच्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही ग्रामपंचायत प्रशासक व ग्राविकास अधिकाऱ्यांना कर भरूण चांगला प्रतिसाद दिला.

येथील ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक डॉ. गणेश ताथोड याच्या हाती आला त्यावेळी ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे ग्रामपंचायतची दैनंदिन कामे करण्यात अडचणी येत होत्या याकरिता थकीत करवसुली करणे गरजेचे होते त्याकरिता येथील ग्रामविकास अधिकारी जी. के. धाडसे यांनी अभिनव पद्धत शोधून काढली.

यामध्ये ग्रामविकास अधिकारी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडे जाऊन व ज्यांनी कर भरणा केला त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत व याची प्रसिद्धी स्थानिक सोशल मीडियामधून करत होते. यामुळे नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद लाभला.

यातून झालेल्या वासुलीतूनच कर्मचाऱ्यांना दिवाळीत होईल तेवढा पगार देण्यात आला तसेच संपूर्ण गावात विजेचे दिवे लावण्यात आले. पाणीपुरवठाही व्यवस्थित करण्यात आला. आठवडी बाजारात साफसफाई करण्यात आली.

कुरणखेड येथे मोठ्या प्रमाणात थकीत कर आहे. असेच सहकार्य नागरिकांकडून लाभले तर आणखीही कामांना गती मिळेल.
-डॉ. गणेश ताथोड, प्रशासक, कुरणखेड ग्रामपंचायत

वसुलीकरिता गावकरी सहकार्य करत असून, ज्यांनी सहकार्य केले त्यांचे कुरणखेड ग्रामपंचायत आभार व्यक्त करते तसेच आणखी सहकार्य अपेक्षा आहे.
-जी. के. धाडसे, ग्रामविकास अधिकारी, कुरणखेड

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Kurankhed Gram Panchayat collected tax by giving a bouquet