esakal | तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या हल्ला, फवारणीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Larvae attack on legumes, farmers start financial matching for spraying

  सद्या तूरीचे पिक जोमात आहे. तुरीचे पीक फुलोऱ्यात तसेच शेंगा लागणाच्या अवस्थेत आहे. हिवरा आश्रम परिसरात कोराडी व पेनटाकळी प्रकल्प असल्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे या परिसरातील तूरीचे पीक हिरवेगार, आणि दाट पानाचे असल्यामुळे अनेक किडी तूर पीकाकडे आकर्षित होत आहे.

तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या हल्ला, फवारणीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू 

sakal_logo
By
संतोष थोरहाते

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) :  सद्या तूरीचे पिक जोमात आहे. तुरीचे पीक फुलोऱ्यात तसेच शेंगा लागणाच्या अवस्थेत आहे. हिवरा आश्रम परिसरात कोराडी व पेनटाकळी प्रकल्प असल्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे या परिसरातील तूरीचे पीक हिरवेगार, आणि दाट पानाचे असल्यामुळे अनेक किडी तूर पीकाकडे आकर्षित होत आहे.

 सद्या तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला झाला असून यामुळे तूरीच्या पीकाचे नुकसान होत आहे. तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून तूरीवर कीड नाशकाची फवारणी करण्याच्या कामात मग्न आहे. तूरीचे पिक वाचविण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधींची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -सराफा दुकानातील नोकराने दुकानासमोरच घेतला गळफास!

 सद्या तूरीचे पीक फुलोऱ्यात तसेच शेंगा लागणाच्या अवस्थेत आहे. खरीप हंगामातील तूर पिकामुळे शेतकऱ्याला चांगल उत्‍पन्न मिळते. त्‍यामुळे या पिकाकडे शेतकरी अधिक लक्ष देतो.यावर्षी अगोदरच बळीराजोच शेतीचे नियोजन अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे पुरते कोलमडले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे बळीराजाच्या मूग,उडीद व सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

हेही वाचा -  राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

 त्‍यामुळे अगोदच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सद्या तूर शेंगा धरण्याच्या अवस्थेत असून तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या हल्याने बळीराजा हवालदिल झाल्याचे दिसून येते आहे. खरीपातील सोयाबीन व कापसाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. आता शेतकऱ्याची संपूर्ण आशा तूर पिकावर अवलंबून आहे. तूर पिकावरच पुढील आर्थिक नियोजन असल्यामुळे तूर पिकावर झालेल्या तूर पोखरणाऱ्या अळीच्या नियोजनासाठी शेतकरी किडनाशकांची फवारणी करण्याच्या कामात मग्न आहे.

 या किडीचा प्रादुर्भाव कळया व फुले लागल्यापासून शेंगापर्यंतच्या काळापर्यंत दिसून येतो. त्‍यामुळे तूर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. शेंगा पोखरणारी आळी सुरूवातीला तूरीच्या कोवळया पानांवर,फुलांवर,शेंगावर उपजीविका करते. या किडीमुळे कोवळया दाण्याचे ६० टक्के नुकसान होते.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

फवारणीची धूरा स्वतःच्या खांदयावर

तूरीचे पिक वाचविण्यासाठी शेतकरी महागडया कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामातील झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे आर्थिक संकटातून सावरत नाही तो तूरीच कीडीचा हल्ला झाला. आर्थिक बाजू कमजोर झाल्यामुळे तूर फवारणीची धुरा स्वतःच्या खांदयावर घेवून शेतकरी फवारणी करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image