वंचित बहूजनचे आघाडीचे भजनी आंदोलन

संजय सोनोने
Thursday, 29 October 2020

 शेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, तसेच यावर्षीची पीक आणेवारी पन्नास टक्क्यांच्या आत दाखवा, शेगाव तालुक्यातील सर्व पिकांचा सर्वे करून हेक्‍टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी. 

शेगाव (जि.बुलडाणा) :  वंचित बहूजनचे आघाडीच्या वतीने शेतकरी समसयेकरीता भजनी आंदोलन केले. 

 शेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, तसेच यावर्षीची पीक आणेवारी पन्नास टक्क्यांच्या आत दाखवा, शेगाव तालुक्यातील सर्व पिकांचा सर्वे करून हेक्‍टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी. 

तसेच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा करून सातबारा कोरा करावा ह्या सर्व मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

 यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, माजी सभापती विठ्ठलराव पाटिल, जिल्हा महासचिव निळकंठ पाटिल, प.स.सभापती सौ.शारदाताई लांजुळकर पाटिल, उपसभापती सौ.शालिनीताई सोनोने, नगरसेविका सौ.प्रितिताई शेंगोकर, शहराध्यक्ष राजेंद्र शेंगोकर, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गवई, दीपक शेंगोकर, जिल्हा उपाध्यक्ष सौ.वर्षाताई इंगळे आदी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Leading Bhajani movement of deprived Bahujan