बाजार समितीत आलंय विक्रमी सोयाबीन, शेतकऱ्यांना ज्यादा भाव, नगदी देयक

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 28 October 2020

येथील सुभाषराव ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी, ता.२६ सोयाबीनला चार हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. सोमवारी येथे हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर मार्केट यार्डपासून एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती.

मंगरुळपीर (जि.वाशीम) ः : येथील सुभाषराव ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी, ता.२६ सोयाबीनला चार हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. सोमवारी येथे हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर मार्केट यार्डपासून एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती.

आतापर्यंत ५६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रामकृष्ण पाटील यांनी दिली.

वाशीम जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे पीक अधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतले आहे. अजूनही पीक येणे बाकी आहे. सोमवारी ता. २६ ला सोयाबीनची विक्रमी आवक झाली असून, यामध्ये वाशीम, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता.

त्याचे कारण की येथे प्रतीक्विंटलला ४ हजार ते सरासरी ४ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. शेतकऱ्यांना नगदी देयक देण्यात आले. नेहमीच्या तुलनेत सध्या मंगरुळपीरमध्ये सोयाबीनची आवक जास्त झाली आहे.

इतर बाजार समितीच्या तुलनेत मंगरुळपीर बाजार समितीत पारदर्शकता व जास्त भाव व नगदी पैसे मिळत असल्याने आम्ही आमचा माल या बाजार समितीत विकायला आणला असल्याचे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Record soybean in the market committee, higher prices to farmers, cash payment