esakal | ‘माय-बाप’ हो निदान तुमच्या कुटुंबाचा विचार करा!, पोलिसांनी केली महामार्गावर हेल्मेट जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: At least think of your family !, Police conduct helmet awareness on the highway

‘माय-बाप’ हो आपली नाही तर निदान आपल्या कुटुंबाची काळजी करा! असे म्हणत राष्ट्रीय महामार्ग क्रमांत सहा वरील शिवणी विमानतळाजवळ वाहतूक पोलिस उभे राहुन विना हेल्मेट दुचाकी चालवत असलेल्या चालकांना थांबवून हेल्मेट वापरण्यासाठी विनंती करून हेल्मेट का वापरावे याबाबत जनजागृती करत होते.

‘माय-बाप’ हो निदान तुमच्या कुटुंबाचा विचार करा!, पोलिसांनी केली महामार्गावर हेल्मेट जनजागृती

sakal_logo
By
सिद्धार्थ वाहुरवाघ

अकोला:‘माय-बाप’ हो आपली नाही तर निदान आपल्या कुटुंबाची काळजी करा! असे म्हणत राष्ट्रीय महामार्ग क्रमांत सहा वरील शिवणी विमानतळाजवळ वाहतूक पोलिस उभे राहुन विना हेल्मेट दुचाकी चालवत असलेल्या चालकांना थांबवून हेल्मेट वापरण्यासाठी विनंती करून हेल्मेट का वापरावे याबाबत जनजागृती करत होते.

आता समज परंतु, पुन्हा विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास ५०० रुपये दंड वसुल करण्यात येणार असल्याचेही त्यांच्याकडून आवर्जुन सांगताना पोलिस दिसत आहेत.


महामार्ग असो वा इतर कुठलाही रोड प्रत्येक ठिकाणी चारचाकी, ट्रक किंवा इतर वाहने मनमानी चालविताना दिसून येतात. त्यामुळे दुचाकी चालविताना चालकांना खूप कसरत करावी लागते. एखाद्यावेळी वाहनचाकाचे नियंत्रण सुटले की, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अपघात झाला तर, अनेक वेळा दुचाकीस्वाराचा घटनास्थळी किंवा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अनेकांना कायमचे अपगंत्व आले आहे.

मृत्यू अपगंत्व झाल्यास स्वतःच्या कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर येते. अशा वेळी मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न करणे आपल्या पश्‍चात कुटुंबातील इतर व्यक्तींना खूप कठीण होते. त्यामुळे तशी वेळ विनाकारण आपल्यावर किंवा आपल्या पश्‍चात कुटुंबातील सदस्यांवर येऊ देऊ नका. बाजारात ५०० रुपये किंमतीपासून विक्रीला असलेले हेल्मेट दुचाकी चालविताना सतत वापरा आणि आपला जीव वाचवा.

विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास प्रत्येक वेळी तुम्हच्याकडून ५०० रुपयाप्रमाणे दंड वसूल करण्यात येणार आहे. सतत दंड भरल्यापेक्षा एकदा हेल्मेट विकत घेऊन त्याचा नियमित वापर करून पोलिसांनाही सहकार्य करण्याची विनंती वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. आता या विनंतीला दुचाकी चालक किती मान देतात याकडेही पोलिसांचे लक्ष लागले आहे. शिवणी विमानताळावर जनजागृती दरम्यान २०-२५ विना हेल्मेट दुचाकी पुरुष-महिलांना थांबवून त्यांना समज देण्यात आला. एपीआय सुहास राऊत यांच्या मार्गदर्शन महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणेचे दिलीप महल्ले, संजय टेकाडे, प्रशांत चिकटे, अविनाश राठोड, आदिनाथ गर्जे, योगेश मेहरे यांनी जनजागृती केली.


दंडा एवजी हेल्मेटचं खरेदी करून द्यावे
विना हेल्मेट दुचाकी चालविताना आढळून आल्यास अशा वाहनचाकला ५०० रुपये दंड देण्याएवजी त्याला जागेवरच हेल्मेट खरेदी करून द्यावे. राष्ट्रीय महामार्गावर दुसऱ्या राज्यातून विक्रीला आणलेले हेल्मेट पोलिसांसाठी एक पर्याय ठरू शकते. त्यामुळे विना हेल्मेट चालविणाऱ्या दुचाकी चालकांजवळून एक प्रकारचा दंडच आकारला जाऊ शकते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image