
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्या आले आहे.
अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्या आले आहे.
या धोरणाचाच भाग म्हणून ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधिची मुल्य साखळी संवर्धीत करण्यात येत आहे.
बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल, अशी संकल्पना राज्यात सुरू करावी,
यासाठी ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राबविण्यात यावे. उपक्रमांतर्गत शेतकरी/शेतकरी गट या व्यवस्थेद्वारे थेट ग्राहकांपर्यंत जोडण्यात यावे, असे राज्य शासनाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.