esakal | राजकीय क्षेत्रात खळबळ; महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा केला प्रयत्न 
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Mahavikas Aghadi corporators tried to set fire to petrol

स्थानिक दुर्गा चौकामधील नगर परिषदेच्या मालकीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चा लिलाव हा सर्व नगरसेवकांना व नागरिकांना अंधारात ठेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ जळगाव (जामोद) नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ ,शिवसेनेचे नगरसेवक रमेश ताडे आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या समक्ष पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न दिनांक सहा नोव्हेंबर रोजी केला.

राजकीय क्षेत्रात खळबळ; महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा केला प्रयत्न 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

जळगाव जामोद (जि.बुलडाणा): स्थानिक दुर्गा चौकामधील नगर परिषदेच्या मालकीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चा लिलाव हा सर्व नगरसेवकांना व नागरिकांना अंधारात ठेवून मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ जळगाव (जामोद) नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका शिवसेना प्रमुख गजानन वाघ ,शिवसेनेचे नगरसेवक रमेश ताडे आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या समक्ष पेट्रोल अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न दिनांक सहा नोव्हेंबर रोजी केला.

त्यामुळे राजकीय परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळला.

नगर परिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक २५,२८आणि ३०वर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील २८ दुकानांची लिलाव प्रक्रिया शहरात येतच नसलेल्याबएका दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करून सर्व नगरसेवकांना व नागरिकांना अनभिद्न्य ठेवून काही विशिष्ट पदाधिकारी  व मुख्याधिकार्‍यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.त्या निषेधार्थ माजी नगराध्यक्ष गजानन वाघ, नगरसेवक रमेश ताडे ,काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, नितीन ढगे,ऍड संदीप मानकर ,कलिंम ,संजय भुजबळ, अब्दुल जाहीर यांनी मुख्याधिकारी डॉ  आशिष बोबडे यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने गजानन वाघ आणि रमेश ताडे यांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल मुख्याधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांच्या केबिनमध्ये अंगावर घेतले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने पोलिसांना तात्काळ पाचारण केल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला .

यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी कक्षातआणि नगरपरिषद मध्ये प्रचंड खळबळ उडाली, शेवटी मुख्याधिकार्‍यांनी सर्व लिलाव प्रक्रिया रद्द करून त्याला मुदतवाढ देण्याचे लेखी पत्र गजानन वाघ आणि अर्जुन घोलप यांना सुपूर्द केल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस विभागाचे दयाराम कुसुंबे,गणेश पाटील यांनी समनव्याची योग्य भूमिका घेतली.

काही नगरसेवकांच्या दबावात येऊन मुख्याधिकारी यांनी दुर्गा चौकातील २८ गाड्यांची निविदा प्रक्रिया राबवून हे गाळे सर्व जनतेला अंधारात ठेवून काही विशिष्ट व्यक्तींच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. न.प.चे मुख्याधिकारी या नात्याने डॉ.आशिष बोबडे यांना ही बाब शोभणारी नाही. ह्यापूर्वी सुद्धा काही विशिष्ट नगरसेवकांच्या दबावात येऊन बरेच गैरप्रकार मुख्याधिकारी यांनी केले आहेत. ह्यापुढे ह्या विशिष्ट लोकांची दहशत महाविकासआघाडी कधीही सहन करणार नाही

सर्वांना अंधारात ठेवून केलेल्या निविदा  प्रक्रियेमुळे नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असते. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविल्यास न.प.चा कोट्यावधी रुपयाचा फायदा होईल.
- गजानन वाघ, तालुका शिवसेना प्रमुख व नगरसेवक

(संपादन - विवेक मेतकर)

loading image