esakal | भाजपच्या माजी उपाध्यक्षांसह अनेक पक्ष सोडण्याच्या तयारीत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Many parties, including former BJP vice-president, are preparing to leave

भारतीय जनता पक्षातील अकोला जिल्ह्यात असलेली अस्वस्थता नाथाभाऊच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासोबतच उफाळून आली आहे. पक्षाचे माजी उपाध्यक्ष गजानन भटकर यांच्यासह अनेकांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच भाजपमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या माजी उपाध्यक्षांसह अनेक पक्ष सोडण्याच्या तयारीत

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला :  भारतीय जनता पक्षातील अकोला जिल्ह्यात असलेली अस्वस्थता नाथाभाऊच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासोबतच उफाळून आली आहे. पक्षाचे माजी उपाध्यक्ष गजानन भटकर यांच्यासह अनेकांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच भाजपमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.


अकोला जिल्ह्यात नाथाभाऊ उर्फ एकनाथ खडसे यांचे अनेक समर्थक आहेत. त्यात पक्षाच्या विविध पदांवर काम करणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि माजी नगरसेवक गोपी ठाकरे हे तर नाथाभाऊंचे निकवर्तीय माणले जात होते.

त्यांनी अद्याप नाथाभाऊंसोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गजानन भटकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे.

भटकर यांनी नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र त्यांच्यासोबत तेही राष्ट्रवादीत जाणार का, याबाबत बोलताना त्यांनी भाजप सोडणार हे नक्की असल्याचे सांगून अद्याप कोणत्या पक्षात जायचे हे निश्चित नसल्याचे सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top