आरक्षण सोडतीचा अनेक दिग्गजांना फटका

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 1 December 2020

 स्थानिक नगरपंचायतच्या आरक्षण सोडतीनंतर आता दोन्हीं उपाध्यक्षाना नवीन प्रभाग शोधावे लागणार आहेत. विद्यमान नगराध्यक्षा रेखा बळी यांना पुन्हा त्याच प्रभागातून निवडणूक लढविता येणार आहे.

मालेगाव (जि.अकोला) : स्थानिक नगरपंचायतच्या आरक्षण सोडतीनंतर आता दोन्हीं उपाध्यक्षाना नवीन प्रभाग शोधावे लागणार आहेत. विद्यमान नगराध्यक्षा रेखा बळी यांना पुन्हा त्याच प्रभागातून निवडणूक लढविता येणार आहे.

नगरपंचायतच्या १७ नगरसेवकांसाठी येत्या जानेवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण सोडतीनंतर विद्यमान नगरसेवकांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष संतोष जोशी यांचा प्रभाग क्र. १७ सर्व साधारण महिला करिता राखीव झाला आहे.

त्यामुळे ते तेथून निवडणूक लढवू शकणार नाहीत त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
नगरपंचायत सभापती तथा गटनेते गजानन सारसकर यांचा प्रभाग क्र. ९ अनुसूचित जाती साठी राखीव झाला आहे. त्यामुळे ते आता प्रभाग क्र. ८ मधून निवडणूक लढवू शकतात. माजी नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत यांचा प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

या प्रभागातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव चोपडे निवडणूक लढवितील अशी चर्चा आहे. तर, परमेश्वर सावंत प्रभाग क्र. ३ मधून निवडणूक लढवू शकतात. माजी उपाध्यक्ष गोपाल मानधने यांचा प्रभाग क्र. ६ आता इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे आता त्यांना तेथून निवडणूक लढविता येणार नाही.

चंदू जाधव व सरला चंदू जाधव यांचे प्रभाग क्र. ८ व १३ इतर मागासवर्गासाठी राखीव आहेत. त्यामुळे चंदू जाधव प्रभाग क्र. १ मधून तर त्यांच्या पत्नी सरला जाधव ह्या प्रभाग क्र. ९ मधून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना आपला प्रभाग सोडून इतर प्रभागात भाग्य आजमावे लागणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Many veterans of reservation draw hit