मास्क व सोशल डिस्टंन्सिंचा पडला विसर, प्रशासनासह नागरिकांचे गांभीर्य हरविले

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 26 November 2020

 दिवसागणिक ‘कोरोना’ चे रुग्ण वाढत असले तरी, नागरिक अजूनही बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. नुकताच झालेला दिवाळीचा सण, सुरु झालेली मंदिरे, उघडलेल्या शाळा, नागरिकांचा विना मास्कचा मुक्तसंचारामुळे कोरोनाचा पुन्हा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रिसोड (जि.वाशीम) : दिवसागणिक ‘कोरोना’ चे रुग्ण वाढत असले तरी, नागरिक अजूनही बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. नुकताच झालेला दिवाळीचा सण, सुरु झालेली मंदिरे, उघडलेल्या शाळा, नागरिकांचा विना मास्कचा मुक्तसंचारामुळे कोरोनाचा पुन्हा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या सूचना दिल्या जात असल्या तरी त्याकडे मात्र, गांभीर्याने घेतले जात नसल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गत दोन महिन्यात कोरोना रुग्णाच्या संकेत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहेत. आजही नागरिकांना कोरोना आजाराचा जणू विसरच पडला आहे. जवळपास २० टक्के नागरिक मास्कचा वापर करत आहेत.

हेही वाचा -  अकोला, वाशीम जिल्ह्यात बसविणार ‘डमी वॉर टँक

काही नागरिकांचे मास्क दिवसभर गळ्यातच लटकलेली दिसतात. गत काही दिवसांपासून सोशल डिस्टंन्सिंग कुठे दिसत नाही. कोरोना संसर्गजन्य आहे. त्यातच थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्ण संख्येत वाढवण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही आरोग्य विभागाकडून केल्या जात आहे. परंतु, नागरिकांकडून कुठल्याप्रकारची खबरदारी घेतली जात नाही. त्यातच मंदिरा पाठोपोठ शाळा उघडल्यामुळे गर्दीमध्ये आणखीच भर पडली आहे. नागरिक विना मास्क मुक्त संचार करत आहेत. परिणामी कोरोना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनाकडूनही अमलबजावणी नाही
एकीकडे राज्य शासनाच्या विविध मंत्र्यांकडून दररोज कोरोनाबाबत गंभीर इशारे दिले जात आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात साथरोग कायद्याची उघड पायमल्ली केली जात आहे. मास्क बांधणे बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास पाचशे रुपये दंड ठोठावला जाणार अशी घोषणा झाली. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक विनामास्क फिरत आहेत.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

प्रसार वाढताच चाचण्यात घट
कोरोना बाधितांची आकडेवारी खाली आलेली दिसत असली तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. गेल्या महिनाभरात कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडाही खाली आला आहे. शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यातून ३० च्या वर शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. चाचणी झाली म्हणूनच कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.

विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीला बगल
शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मात्र कोणत्याही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली नाही. तसेच स्कूलबस चालकांचीही कोरोना चाचणी न झाल्याने शिक्षण विभागाकडून अर्धवट उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.

बाजारपेठा कोरोनाच्या वाहक
सध्या बाजारपेठेत तुफान गर्दी होत आहे. या गर्दीत ५० टक्के च्यावर नागरिकांना मास्क नसतो तसेच सामाजिक दुरावा दुकानात पाळला जात नाही. व्यापारी एक फलक लटकवून आपली जबाबदारी झटकत असल्याने भविष्यात बाजारपेठाच धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Masks and social distances are forgotten, the seriousness of the citizens including the administration is lost