esakal | नातेवाईकांनी नाकारलेल्यांना आमदारांनी स्वीकारले, कोरोनाग्रस्तांच्या मृत्युनंतर स्वतः पार पाडले रक्षाविसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: MLAs accept rejections by relatives, carry out self-defense after death of coroners

कोरोना या जीवघेण्या संकटाच्या काळात जिवाभावाच्या नातेवाईकांनी मृत्युनंतर पाठ फिरविली! मात्र बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्कारानंतरचा रक्षा विसर्जनाचा विधी कार्यकर्त्यांसह जाऊन स्वतः पार पाडला. त्यामुळे मृत्यूनंतर आप्तस्वकीयांनी नाकारलेल्यांना आमदार गायकवाड यांनी स्वीकारल्याची शहरात चर्चा होती.

नातेवाईकांनी नाकारलेल्यांना आमदारांनी स्वीकारले, कोरोनाग्रस्तांच्या मृत्युनंतर स्वतः पार पाडले रक्षाविसर्जन

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा/ अकोला  : कोरोना या जीवघेण्या संकटाच्या काळात जिवाभावाच्या नातेवाईकांनी मृत्युनंतर पाठ फिरविली! मात्र बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्कारानंतरचा रक्षा विसर्जनाचा विधी कार्यकर्त्यांसह जाऊन स्वतः पार पाडला. त्यामुळे मृत्यूनंतर आप्तस्वकीयांनी नाकारलेल्यांना आमदार गायकवाड यांनी स्वीकारल्याची शहरात चर्चा होती.


येथील त्रिशरण चौकात हिंदू स्मशानभूमी आहे. याठिकाणी कोरोना ग्रस्त झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या अनेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वेळा एखाद-दुसरा नातेवाईक उपस्थित असेलही. परंतु बहुतांश वेळा शासकीय कर्मचारी यांनीच हा विधी उरकला होता. अशा अनेक अंत्यसंस्कारानंतर त्यांचे रक्षाविसर्जन करण्याचे सोपस्कारही नातेवाईकांनी पार पडले नाहीत.

ही बाब लक्षात येताच आमदार संजय गायकवाड यांनी हेच अंतिम संस्कार विधी पार पाडण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आज (ता. 4) त्रिशरण चौकातील स्मशानभूमी मध्ये त्यांच्या रक्षा विसर्जनाचे दायित्व पार पाडले.


अग्नित जळलेल्या देहात विषाणू कसे?
एकीकडे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गरम पाणी प्या, वाफ घ्या असे सांगितले जाते. मात्र जो मृतदेह अनेक तास अग्निकुंडात जळतो त्यानंतर त्या ठिकाणी एकही विषाणू राहत नाही. याचा विचार न करता अनेक नातेवाईकांनी रक्षाविसर्जन हा विधी पारच पाडला नाही.

तो संकल्प  गायकवाड यांनी केला व सहकाऱ्यांसह जाऊन त्यांनी मृतकांच्या अस्थी स्वतः गोळा करून व त्या ठिकाणी स्वच्छता करून त्या अस्थिचे जलाशयामध्ये विसर्जन केले.

(संपादन - विवेक मेतकर)