आता झाली ना पंचाईत! गणेशाच्या मंडपात आरतीला 10 पेक्षा अधिक लोकांना मनाई, दिवसातून तीन वेळी करावे लागणार निर्जंतुकीकरण

मनोज भिवगडे
Friday, 21 August 2020

 गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळात आरती करताना मंडपामध्ये एकावेळी १० पेक्षा अधिक लोकांना परवानगी राहणार आहे.

अकोला : गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळात आरती करताना मंडपामध्ये एकावेळी १० पेक्षा अधिक लोकांना परवानगी राहणार आहे.

गणेश मंडपाचे आकार आणि मूर्तीची उंची यापासून ते विसर्जनापर्यंत मंडळांना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 याबाबतच्या सूचना प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळांना मनपाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. याशिवाय मंडपाचा आकार मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा-  तुम्हाला माहिती आहे का? कशी करतात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा

मूर्तीची उंची चार फुटापेक्षा अधिक राहणार नाही. याशिवाय प्रसाद वितरण व फुल वाहण्यालाही मनाई करण्यात आली आहे. या शिवाय कोरोना संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे.

सॅनिटायझर वापरताना! मग आरतीपासून रहा दोन हात दूर, नाहीतर जीव येईल धोक्यात, हे आहे कारण

सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांसाठी सूचना

 • आरोग्‍य विषयक व सा‍माजिक संदेश असलेल्‍या जाहिरातीना पसंती द्यावी.
 • आरोग्‍य विषयक उपक्रम, रक्‍तदान शिबिरांनाच परवानगी.
 • श्री गणेशाच्‍या आरतीच्‍या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्‍त भाविक उपस्थित असू नयेत.
 • मास्‍क तसेच सामाजिक अंतरासंबंधीच्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे.
 • गणपती मंडपांमध्‍ये आणि मुख्‍य प्रवेश व्‍दारावर दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे.
 • थर्मल स्‍क्रीनिंगची व्‍यवस्‍था करणे बंधनकारक आहे.
 • गणेश मंडपात एकावेळी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई.
 • श्रींच्‍या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्‍यास मनाई.
 • विसर्जनाची आरती घरीच करून विसर्जन स्‍थळी कमीत कमी वेळेत
 • कमीत कमी लोकांच्‍या उपस्थितीत विसर्जन पार पाडावे.
 • संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती एकत्रितरित्‍या विसर्जनास नेऊन गर्दी करण्‍यास परवानगी असणार नाही.
 • मंडळांचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्‍ये असले तर मंडपातच मूर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहील.
 • सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन गणेश मंडपा लगतच्‍या कृत्रिम तलावातच करावे.
 • गणेशोत्‍सव दरम्‍यान धार्मिक, भक्‍तीपर, इ. गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे.
 • कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्‍यासाठी प्रसाद वाटणे, फुले व हार अर्पण करणे टाळावे..
 • गणेश मंडपाच्‍या परिसरात तसेच त्‍या लगतच्‍या रस्‍त्‍यांवर फुले, हार, प्रसाद इ. विक्रीसाठी स्‍टॉल, दुकाने इ. लावू नयेत.
  (संपादन - विवेक मेतकर)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola news More than 10 people banned from performing Aarti in Ganeshas mandapa, sterilization has to be done three times a day