esakal | मनपाच्या गुर्जींना चार महिन्यांपासून पगारच नाही हो!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Municipal teachers without pay for four months

कोरोना संकटकाळात काम केल्यानंतरही महानगरपालिकेचे शिक्षक चार महिन्यांपासून वेतनाविना आहेत. जून ते सप्टेंबर २०२० या काळात वेतन रखडले असल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

मनपाच्या गुर्जींना चार महिन्यांपासून पगारच नाही हो!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना संकटकाळात काम केल्यानंतरही महानगरपालिकेचे शिक्षक चार महिन्यांपासून वेतनाविना आहेत. जून ते सप्टेंबर २०२० या काळात वेतन रखडले असल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

जुलै २०२० पर्यंतचे शिक्षकांच्या वेतनासाठीचे ५० टक्के अनुदान शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्याकडून महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानंतरही वेतन मिळाले नाही.

याशिवाय २०११ ते २०१३ पर्यंतचे भविष्य निर्वाह निधीचे वेतनातून कपात करण्यात आलेली रक्कम ३.२५ कोटी व सहाव्या वेतन आयोगातील मनपाच्या ५० टक्के हिस्स्याची २.५५ कोटी असे दोन्ही मिळून ५ कोटी ५० लाख रुपये शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावर वळती करण्यात यावेत, या आशयाचे निवेदन ४० शिक्षकांच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष मगफूर अहमद, कार्याध्यक्ष खान सरदार खान, सचिव मो. अनवर हुसेन यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले.