आता तुम्ही कुठेही, कधीही धावू शकता, पंतप्रधान मोदींनी सुरू केली ही चळवळ

Akola News Narendra Modi Fit India Movement
Akola News Narendra Modi Fit India Movement

अकोला :  कदाचित  तुम्हाला घरात बसून-बसून कंटाळा आला असेल. आता तुम्ही कुठेही, कधीही धावू/चालू शकता. पंतप्रधान यांच्याहस्ते 29 ऑगस्ट रोजी फिट इंडिया चळवळीला सुरुवात झाली आहे.

व्यायामाकरीता धावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नियमीत व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वाना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी फिट इंडिया अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

या उपक्रमाअंतर्गत 'तुम्ही कुठेही, कधीही धावू/चालू शकता'. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीशः अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे किंवा चालू शकणार आहेत. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे किवा चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रेकिंग अप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या किंवा चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.

फिट इंडिया फ्रीडम रन मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. सर्वांनी गुगल क्रोम फिट इंडियाच्या www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावचे अकाऊंट तयार करून लॉग इन करावे.

अकाऊंट तयार करतांना नाव, ई-मेल, संपर्क क्रमांक, राज्य, जिल्हा इ. बाबी आवश्यक आहे, लाँग इन केल्यानंतर दिलेली माहितीमध्ये धावलेले किवा चाललेले अंतर, मॅराथॉनची माहिती फोटोसह अपलोड करावी, ही माहिती स्वतंत्रपणे वरील संकेतस्थळावर मोबाईलव्दारे किंवा संगणकाव्दारे अपलोड करावा. सदर अपलोड केली असता यामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई मेल किंवा PDF या फॉरमेटव्दारे प्राप्त होणार आहे. फिट इंडिया माहिती अपलोड केल्यानंतर https://forms.gle/zUU7pRmsq6VGeqt49 या लिंकवर माहिती अपलोड करावी.

अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, एकविध क्रीडा संघटना, विविध क्लब व इतर सर्वांनी फिट इंडिया फ्रीडम रन या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com