अकोला पंचायत समितीमध्ये नो ‘एन्ट्री्’

सुगत खाडे  
Tuesday, 8 September 2020

 कोरोना विषाणू संसर्गाचे अकोला पंचायत समितीमधील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोला पंचायत समितीमध्ये अभ्यांगतांना बुधवार (ता.९) पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पंचायत समितीचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून कार्यालयात केवळ कर्मचारी व अत्यावश्यक कामानिमित्त जाणाऱ्यांनाच बुधवारपर्यंत प्रवेश देण्यात येईल.

अकोला  :  कोरोना विषाणू संसर्गाचे अकोला पंचायत समितीमधील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोला पंचायत समितीमध्ये अभ्यांगतांना बुधवार (ता.९) पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पंचायत समितीचे दोन्ही मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून कार्यालयात केवळ कर्मचारी व अत्यावश्यक कामानिमित्त जाणाऱ्यांनाच बुधवारपर्यंत प्रवेश देण्यात येईल.

अकोला पंचायत समितीमधील कृषी विभागात कार्यरत कर्मचारी गुरुवारी (ता. ३) कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. गुरुवारी (ता. ३) पंचायत समितीमधील कक्षांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने शुक्रवारी (ता. ४) पंचायत समितीत कोरोना तपासणीसाठी रॅपिड अंटीजन टेस्टचे शिबिर घेण्यात आले. शिबिरात ५९ कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता ४ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंचायत समितीचे दोन प्रवेशद्वार बंद करण्या आले आहेत. त्यासोबतच अभ्यांगतांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: No entry in Panchayat Samiti