esakal | हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा बरं!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Online fraud money back!

हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा बरं!  केवायसी न केल्यास डेबिड कार्ड बंद होईल. तुम्ही तुमचे कार्डवरून पैसे काढू शकरणार नाहीत. असे बोलत अकोल्यात सायबर प्रॉड समोर आला आहे. ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहले नाही तर बँक खात्यातून रक्कम चोरीला जाऊ शकते हे या संवादातून ग्राहकांच्या लक्षात येत नाही.

हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा बरं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा बरं!  केवायसी न केल्यास डेबिड कार्ड बंद होईल. तुम्ही तुमचे कार्डवरून पैसे काढू शकरणार नाहीत. असे बोलत अकोल्यात सायबर प्रॉड समोर आला आहे. ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहले नाही तर बँक खात्यातून रक्कम चोरीला जाऊ शकते हे या संवादातून ग्राहकांच्या लक्षात येत नाही.

या घटना वारंवार होत असतानाही अकोल्यातील एका महिलेला हा निष्काळजीपणा चांगलाच महागात पडला होता. मात्र सायबर पोलिसांनी सूत्र हलवून तक्रार महिलेला तिच्या खात्यातून चोरीला गेलेली ४५ हजार ५०० रुपये परत मिळवून दिले.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार शुभदा चंद्रकांत जोशी (रा. अकोला) यांना ता. १० जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे मोबाईल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. त्याने बँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसी न केल्यास डेबिड कार्ड बंद होईल. तुम्ही तुमचे कार्डवरून पैसे काढू शकरणार नाहीत.

त्यावर तक्रारदार महिलेला संपूर्ण कार्डची माहिती विचारली व ओटीपी सुध्दा. महिलेने ती अज्ञान व्यक्तीला दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तक्रारदार महिलेच्या खात्यातून ४३ हजार ५०० रुपये काढून घेतले.

महिलेने झालेल्या फसवणुकीची सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर पोलीसांनी कारवाई करीत संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली. सायबर पो.स्टे. अकोला येथील पो.कॉ. ओमप्रकाश देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या मदतीची माहिती तक्रारदार महिलेने पोलिस अधीक्षकांची भेट घेवून दिली व त्यांचे आभार मानले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top