३० नोव्हेंबरपर्यंत मिळवा नोकरी, ऑनलाईन मुलाखती घेऊन प्रक्रीया राबविणार

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 26 November 2020

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोलाचे वतीने ऑनलाईन पंडित दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयेाजन करण्यात आले आहे.  २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा मेळावा पार पडणार आहे.

अकोला :  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देशाने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोलाचे वतीने ऑनलाईन पंडित दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयेाजन करण्यात आले आहे.  २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा मेळावा पार पडणार आहे.

मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी व त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील. दहावी, बारावी, आय.टी.आय.,पदवीका व पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या महास्वयम या संकेतस्‍थळावर नाव नोंदणी केलेल्‍या सुद्धा नोकरीसाठी अर्ज करता येईल. दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीका व पदवी पुरुष तसेच महिला उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगइन मधून ऑनलाईन अप्‍लॉय करू शकतात.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांचे कंपनी, उद्योजक व एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील. सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन अप्‍लॉय करुन सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्‍त प्रा.यो. बारस्‍कर यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Online Pandit Deendayal Upadhyay Employment Fair Organized