
सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर कपाशी बीजी-२ बीटी बियाणे वाटप करण्याची योजना जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबवण्यात आली. सदर योजनेच्या लाभापासून बहुतांश शेतकरी अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे कपाशीला बोंड येऊन कपाशीचा वेचा सुद्धा झाला, परंतु शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही, असे टोले शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना स्थायी समितीच्या सभेत मारले.
अकोला : सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर कपाशी बीजी-२ बीटी बियाणे वाटप करण्याची योजना जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबवण्यात आली. सदर योजनेच्या लाभापासून बहुतांश शेतकरी अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे कपाशीला बोंड येऊन कपाशीचा वेचा सुद्धा झाला, परंतु शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही, असे टोले शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना स्थायी समितीच्या सभेत मारले. याव्यतिरीक्त कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याच्या मुद्द्यावर सभेत वादळी चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा शुक्रवारी (ता. २७) ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या बीटी कपाशी बियाण्यांच्या योजनेवर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी प्रश्न उपस्थित केला. हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी सदर योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांना अद्यापही लाभ मिळाला नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मोजक्याच शेतकऱ्यांच्या खातात लाभाची रक्कम जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर यामुद्द्यावर शिवसेनेचे सदस्य डॉ. प्रशांत अढावू यांनी प्रश्न उपस्थित केला. लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाने पेरेपत्रकाची अट शेतकऱ्यांवर लादल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर उत्तर देताना कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांनी दोन दिवसांत यासंबंधीची कार्यवाही करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल, असे सभेत सांगितले. हेही वाचा - बँकांची कामं करायची कशी, संप आणि वीकेंडमुळे चारपैकी तीन दिवस बँका बंद
सभेत खोळंबा; आवाजाचा पत्ता नाही हेही वाचा - शासनाकडून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची फसवणूक इतर मुद्यांवर सुद्धा वादळी चर्चा (संपादन - विवेक मेतकर) |
|||