esakal | संत्र्याच्या आंबिया बहाराला लागली गळती
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Orange Ambia Bahara started leaking

एकीकडे शासनामार्फत कोरोना आजाराविरुद्ध लढण्यासाठी रोग प्रतिकाराक शक्ती वाढावी यासाठी संत्रा या फळे खाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी शेतातील संत्रा माल विक्री करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी भाव पाडले असून, विक्री अभावी आंबिया बहारातील झाडावरील संत्र्याला प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीमुळे गळती लागली आहे.

संत्र्याच्या आंबिया बहाराला लागली गळती

sakal_logo
By
सागर भालतिलक

बोर्डी (जि. अकोला)  ः एकीकडे शासनामार्फत कोरोना आजाराविरुद्ध लढण्यासाठी रोग प्रतिकाराक शक्ती वाढावी यासाठी संत्रा या फळे खाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी शेतातील संत्रा माल विक्री करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी भाव पाडले असून, विक्री अभावी आंबिया बहारातील झाडावरील संत्र्याला प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीमुळे गळती लागली आहे.


गेल्या वर्षी कमी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या संत्रा बागा पाण्याअभावी सुकल्या होत्या. पर्यायाने त्या तोडाव्या लागल्या. या परिस्थितीही काही शेतकऱ्यांनी संत्रा बागा थोडेफार ओलिताची सोय असल्याने जगवल्या. या बागांमध्ये आंबिया बहाराचा संत्रा बहरला आहे. मात्र यावर्षी अती पावसामुळे सतत ओलावा असल्याने आणि वातावरणातील बदलामुळे आंबीया बहाराला गळती लागली आहे.

त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान होताना दिसत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होताना दिसत आहे. सुरुवातीला चारशे ते पाचशे रुपये प्रती २० किलोची कॅरेटची मागणी होती; मात्र गेले काही दिवसांपासून दीडशे ते दोनशे रुपये दर आकारले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच मुस्कटदाबी होताना दिसत आहे.


संत्रा उत्पादकांची दुहेरी कोंडी
अकोट तालुक्यातील बोर्डीसह रामापूर, शिवपूर, राहणापूर, जितापूर, उमरा, सुकळी, अकोलखेड, अकोली जहागीर, वस्तापूर, पोपटखेड, आंबोळा हा सातपुड्याचा भाग फळबागेसाठी चांगला आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेती ही संत्रा लिंबू आणि केळीमध्ये व्यापली आहे. या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी मागील काही वर्षांपासून सातत्याने या-ना त्या कारणाने अडचणीत येत आहे. कधी पाणी कमी झाल्याने तर कधी जास्त झाल्याने कोंडीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबिया आणि मृग असा दोन्ही प्रकारच्या बहार येतो. त्यापासून मुबलक प्रमाणात पैसे मिळण्याची अपेक्षा येथील शेतकरी करीत होते; मात्र हवामानातील बदल आणी व्यापारी वर्गाकडून होणारी अडवणूक यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच भरडून निघत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)