esakal | अन्यथा येणारी दिवाळी मंत्र्यांच्या घरी साजरी करणार-रविकांत तुपकर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Otherwise, the coming Diwali will be celebrated at the ministers house

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.१३) रिसोड जिल्हा वाशीम तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

अन्यथा येणारी दिवाळी मंत्र्यांच्या घरी साजरी करणार-रविकांत तुपकर

sakal_logo
By
पी.डी. पाटील

रिसोड (जि.वाशीम) :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.१३) रिसोड जिल्हा वाशीम तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्या, अन्यथा येणारी दिवाळी मंत्र्यांच्या घरी साजरी करणार, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.


अतिपावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार शेलार यांना आंदोलनस्थळी रविकांत तुपकरांनी सदर मागण्या सांगितल्या व तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक अहवाल पाठवावा असे सांगितले. त्यावर तहसीलदार यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर, येणारी दिवाळी मंत्र्याच्या घरी साजरी करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला.

संपूर्ण विदर्भ-मराठवाड्यात आंदोलन उभे करणार
अतिपावसाने संपूर्ण विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. संपूर्ण विदर्भ-मराठवड्यात नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभे करणार आहोत व त्या आंदोलनाची सुरुवात ही आजच्या आंदोलनापासून झाली आहे.
- रविकांत तुपकर


तहसीलदारांनी दिली हमी
सकाळपासून शेतकऱ्यांनासह तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारून बसल्यानंतर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. तहसीलदार शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी तहसीलदार यांनी सर्व शेतकऱ्यांसमोर त्यांच्या मागण्या सांगितल्या. यावर तहसीलदारांनी तत्काळ पंचनाम्याचे आदेश देवून लवकरच नुकसान भरपाईसाठी सकारात्मक अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.


मोर्चात हजारोंची उपस्थिती
रविकांत तुपकर व दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

(संपादन - विवेक मेतकर)