साहेब, नको आम्हाला अनुदान, आमच्या हाताला द्या काम !

Akola News: Allow the ceremonies to begin
Akola News: Allow the ceremonies to begin

 अकोला :  विवाह व मांगलिक कार्यक्रमांना अधिक संख्येने परवानगी मिळावी,लॉन व भवन सुरू व्हावेत यासाठी स्थानीय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवार पासून विवाह सेवा संघर्ष समितीच्या वतीने सोमवार पासून सुरु झालेल्या साखळी आंदोलनास अनेक संस्था,संघटना व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सहर्ष पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला.

शासन अनलॉकडाउन पांच मध्ये सर्व क्षेत्रांना हळू हळू सुरू करण्याची परवानगी मिळत असून समाजाच्या सांस्कृतिक व कौटुंबिक उपक्रमांना परवानगी देण्यात आली नाही.परिणामी या क्षेत्रातील व्यावसायिक व कामकरी वर्गावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

शासनाने या काळात भवन, लॉन पूर्ववत सुरू करावेत व विवाह सोहळ्यातील वरातीना परवानगी देण्यासाठी विवाह सेवा संघर्ष समितीच्या अंतर्गत येणाऱ्या टेट डेकोरेटर असो, लान , मंगल कार्यालय असो,इवेंट मॅनेजमेंट असो ,फ्लावर डेकोरशन असो,साऊंड अॅड लाइट असो,फॉटोग्राफर असो , वेडिंग प्रिंटिंग असो , बैंड असो , घोडी बग्गी असो , ब्राह्मण संगठन समवेत लग्न व मंगल कार्यालयाला सहाय्य करणान्या सर्व वर्गाच्या संस्था व संघटनाच्या वतीने साखळी आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाचे समापन बुधवार दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. दरम्यान आंदोलन स्थळी ज्येष्ठ सेवाभावी नाना उजवने, घनशाम कलंत्री,माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आ. गोपिकिसन बाजोरिया,माजी आ.बबनराव चौधरी, माजी. जि.प.अध्यक्ष बालमुकुंद भिरड, डॉ.अभय  पाटील,विजय मालोकार, हरीश अलीमचंदानी,सतीश ढगे, अविनाश देशमुख, एड. महेश गणगणे,डॉ चंद्रकांत पनपालिया,प्रकाश घोगलिया, प्रकाश लोढिया,प्रदीप वखारिया, जावेद जकारिया,राहुल राठी, योगेश अग्रवाल,अशोक गुप्ता, बसंत बाचुका,अग्रवाल समिती अध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, कॅट पदाधिकारी निकेश गुप्ता,रवी खंडेलवाल समवेत शेकडो गणमान्य पदाधिकारी व नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शविला .


 या आंदोलनात बुधवार दि . १४ औक्टो रोजी फॉटोग्राफर असो , एकता घोडी असो , एकता वाजंत्री असो. चे पदाधिकारी सहभागी होणार आहेत .
 या साखळी धरणे आंदोलनात सहभागी होणाऱ्या ची खानपान व्यवस्था गुड्डू ठाकूर,संजय सिसोदिया,अनिल चांडक,अल्पेश उपाध्याय, कृष्णा राठी आदींनी सांभाळली तर वकृत्व प्राप्ती शर्मा,पूजा अडवाणी,राम व आनंद जहागीरदार यांनी सांभाळली.


समारोपीय दिवशी साखळी धरणे आंदोलनात सामाजिक अंतर राखून संस्था व संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन विवाह संघर्ष सेवा समितीचे दादासाहेब उजवणे , संजय शर्मा नर्सरी , हेमंत शाह , निखिलेश मालपाणी,संदीप उर्फ सोनू देशमुख,दर्शन गोयनका , कृष्णा राठी , संदीप निकम , नरेंद्र नायसे , सुनील कोरड़िया , गुड्डू पठाण , पंडित शिवकुमार शर्मा , गजानन दांडगे, किरण शाह , भैय्यासाहेब उजवने , योगेश कलंत्री,मंगेश गीते, बाबू बागडे , कमलेश कोठारी , नितिन देशमुख , नीरज भांगे , संजय सिसोदिया , राजू गाडगे , योगेश शेगोकार,अब्रार शहा,अजय ठाकूर, बाळू बागडे, बरकत अली,प्रमोद लांजेवार,शकील भाई,उदय ठाकूर समवेत समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com