esakal | प्रवाशांच्या सेवेत तीन उत्सव विशेष गाड्या, मुंबई-नागपूरला प्रवास करणाऱ्यांना मिळणार सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Passengers traveling to Mumbai-Nagpur will get three festival special trains in the service of passengers

मध्य रेल्वेने प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-नागपूर (साप्ताहिक) नागपूर-मुंबई सुपर फास्ट उत्सव विशेष गाडी वन वे फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ होईल.

प्रवाशांच्या सेवेत तीन उत्सव विशेष गाड्या, मुंबई-नागपूरला प्रवास करणाऱ्यांना मिळणार सुविधा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः मध्य रेल्वेने प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-नागपूर (साप्ताहिक) नागपूर-मुंबई सुपर फास्ट उत्सव विशेष गाडी वन वे फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ होईल.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक-०२०४९ डाऊन मुंबई ते नागपूर उत्सव गाडी सहा फेरी २५ डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ पर्यंत दर शुक्रवारी मुंबई येथून १९.५५ वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर स्टेशनला १०.२५ पोहचेल. सदर गाडीला शेगाव येथे ५.०८ वाजता, अकोला येथे ५.४५ तर मूर्तिजापूर येथे ६.१८ वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक-०२०५० अप नागपूर ते मुंबई उत्सव गाडी २७ डिसेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत दर रविवारी नागपूर येथून १६.३० वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई स्टेशनला ६.१५ वाजता पोहचेल. ही गाडी मूर्तिजापूर येथ २०.०३, अकोला येथे २०.३५, शेगाव येथे २१.१३ वाजता पोहचेल.

या गाडीला द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, दोन द्वितीय आसन श्रेणीचे डब्बे जोडलेले असतील. नागपूर-मुंबई सुपर फास्ट उत्सव विशेष गाडी वन वे फेरी गाडी क्रमांक-०२०४८ अप नागपूर ते मुंबई उत्सव गाडी २४ डिसेंबर २०२० गुरुवार ला नागपूर हून १८ वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई स्टेशनला ०७.४५ वाजता पोहचेल.

मूर्तिजापूर येथे ही बाडी २१.१९, अकोला येथे २१.५७, शेगाव येथे २२.२९ वाजता पोहचेल. सदर गाड्यांचे बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर २१ डिसेंबर पासून सुरू होईल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची, प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image