esakal | ‘गाव तेथे पाटी’, गावकऱ्यांसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Pati in the village, trying to communicate with the villagers

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलिस दलामार्फत जनता व पोलिस संबंध संवादातून प्रस्थापित करण्यासाठी तसेच गावात होणाऱ्या सर्व प्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता ता. १५ ऑगस्ट २०२० पासून ‘एक गाव एक’ पोलिस हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

‘गाव तेथे पाटी’, गावकऱ्यांसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलिस दलामार्फत जनता व पोलिस संबंध संवादातून प्रस्थापित करण्यासाठी तसेच गावात होणाऱ्या सर्व प्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता ता. १५ ऑगस्ट २०२० पासून ‘एक गाव एक’ पोलिस हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


एखादी वाईट घटना घडल्यानंतर तत्काळ काय उपाय योजना करावी याचे भान सर्वसामान्य जनतेला नसते. कधी कधी आपण एखादी वाईट होणारी घटना टाळू सुद्धा शकतो. मोठी हानी होण्यापासून इतरांना वाचू शकतो.

कोणतेही संकट म्हटले की, आपल्याला पोलिस आठवतात. ते सदैव संकटात मदतीला धावून येत असतात; परंतु पोलिसांशी संपर्क कसा करावा? कोणते पोलिसांच्या मदतीचे नंबर आहेत? याची माहिती व्हावी याकरता ‘एक गाव एक पोलिस’ योजनेअंतर्गत ‘गाव तेथे पाटी’ ही संकल्पना राबविण्यात आली.

पोलिस अंमलदार यांना गाव दत्तक दिले आहे. त्यांनी गावाविषयीची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले असून, गावकरी मंडळी सहकार्यातून प्रत्येक गावाचे मुख्य रस्त्यावर तसेच गावाचे मुख्य ठिकाणी अकोला पोलिस हेल्पलाईन नंबर असलेले फलक लावण्यात आले आहे.


२०० गावांत राबवला उपक्रम
गाव ते पोलिसांचे नंबर असलेली पाटी २०० गावांमध्ये लावण्यात आली आहे. जेणेकरून गरज असल्यास ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधता येईल. संपूर्ण जिल्ह्यात पोलिस स्टेशन स्तरावर ८२५ गावांकरिता ५५५ आमदार नेमलेले असून, त्यांचे चार विभागात विभागणी करण्यात आली आहे. १७८ व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा तयार करण्यात आले आहे. नागरिकांचे तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे. प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येत असून, आज पावेतो १२८ गाव ग्रामसुरक्षा दल तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.

 (संपादन-विवेक मेतकर)

loading image