गरीब मजुराचे हरविले पाकीट, पोलिसांना सापडले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

शहरातील गजबजलेला गांधी चौक, दिवाळीच्या खरेदी निमित्ताने बाजार तुडुंब भरलेला, वाहतूक सुरळीत रहावी म्हणून शहर वाहतूक पोलिस डोळ्यात तेल घालून आपले कर्त्यव्य बजावत होते.

अकोला,  ः शहरातील गजबजलेला गांधी चौक, दिवाळीच्या खरेदी निमित्ताने बाजार तुडुंब भरलेला, वाहतूक सुरळीत रहावी म्हणून शहर वाहतूक पोलिस डोळ्यात तेल घालून आपले कर्त्यव्य बजावत होते.

गांधी चौकात कर्त्यव्यास असलेले शहर वाहतूक कर्मचारी सुनील मानकर हे आपले वाहतूक नियमनाचे कर्त्यव्य बजावत असतांना त्यांना चौकात बाजूला एक पाकीट पडलेले दिसले.

त्यांनी सदर पाकीट उचलून पाहणी केली असता त्यात त्यांना अडीच हजार रुपये व आधार कार्ड दिसले, त्यांनी आजू बाजूला चौकशी केली असता त्यांना माहिती मिळाली की १० मिनिटा पूर्वी सायकलवर एक तरुण गेला कदाचित त्याचे ते पाकीट असावे, त्यातील आधारकार्ड वर गोलू जितेंद्र रामरा झाकरूड, सुंदरेल मध्यप्रदेश असा पत्ता दिसला.

वाहतूक कर्मचारी सुनील मानकर हे त्याची चौकशी करीत असतानाच एक सायकल स्वार तरुण अतिशय भेदरलेल्या अवस्थेत चौकशी करीत असतांना दिसला, मानकर ह्यांनी त्याचे जवळ जाऊन चौकशी केली असता त्याने अडीच हजार रुपये असलेले पाकीट हरविल्याचे सांगून दिवाळीच्या खरेदी साठी मजुरीचे ते पैसे असल्याचे सांगितले.

त्याचे नाव विचारले असता त्याने गोलू नाव असून मजुरी कामा साठी मध्यप्रदेश वरून अकोल्यात आल्याचे सांगून पाकीट मिळाले नाही. दिवाळी अंधारात जाणार असल्याचे सांगितले.

खात्री पटल्या नंतर शहर वाहतूक कर्मचारी सुनील मानकर यांनी त्याला त्याचे अडीच हजार रुपये असलेले पाकीट परत केल्यावर त्याचे डोळ्यात कृतज्ञेचे अश्रू आले. त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news : police return poor labour mony in market