लॉकडाउन विरोधात राजकीय पक्ष आंदोलनाच्या तयारीत

akola news Political parties prepare for agitation against lockdown
akola news Political parties prepare for agitation against lockdown

अकोला  ः कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. त्यासाठी तयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात टाळेबंदी संदर्भातील कठोर नियमावली राज्य शासनाकडून जारी करण्याचे संकेत आहेत. त्याविरोधात अकोला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी एकत्रीत लढा देत ‘टाळेबंदी नकोच’चा नारा दिला आहे. टाळेबंदी न करता संसर्ग राेखण्याच्या दिशेने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने टाळेबंदी लादली तर त्याविरोधात जिल्ह्यात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासमाेर टाळेबंदीची अंमलबजावणी करण्याचे आव्हाण असेल.


राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्ग बांधित रुग्ण आहेत, त्यात टॉप टेनमध्ये अकोल्याचाही समावेश आहे. दररोज रुग्ण संख्या २०० च्या पुढे येत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. ते बघता राज्यात पुन्हा टाळेबंदीसारख्या कठोर निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे. पुन्हा लागू होणाऱ्या टाळेबंदीच्या चर्चेने व्यापारी व व्यापारावर अवलंबून असलेले कर्मचारी, किरकाेळ व्यावसाियक धास्तावले आहेत.
................................
राजकीय पक्ष आंदोलनाच्या तयारीत
मजूर, बँड पथक, शेतकरी-शेतमजूर, छोट्या व्यावसाियकांना तर गतवर्षीच्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसला हाेता. त्यामुळे पुन्हा टाळेबंदी लागू केल्यास मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीचे संकेत दिले आहेत. मात्र महािवकास आघाडी सरकाने कोरोना संसर्ग नियंत्रणाचा उपाय नाहीत, असा आराेप भाजपने केला आहे.
........................................
हाल हातावर पोट असणाऱ्यांचेच
टाळेबंदीचा यापूर्वीचा अनुभव व सध्या लागू असलेल्या निर्बंधांमुळेच हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. व्यापारी संकटात सापडले आहेत. पुन्हा कडक टाळेबंदी लागू झाल्यास सर्वच स्तरावरील व्यापारी, कामगार उद्धस्त हाेतील. किरकाेळ व्यापारी, तेथील कर्मचाऱ्यांसह आताच अनेकांचा व्यवसाय डबघाईस आलेला आहे. बाजारपेठ आता न सावरल्यास जिल्ह्याचे अर्थचक्रच थांबून जाईल. त्यामुळे लवकरच विविध व्यापारी संघटना, असाेसिएशन यांच्या चर्चा करून पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, सर्व खाद्यपेय विक्रेता असाेसिएशनचे अध्यक्ष याेगेश अग्रवाल यांनी सांगितले.
.............................
५० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत उद्योग
वर्षभरापूर्वी मार्चच्या अखेरच्या आठवड्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्याचा प्रभाव आजही जाणवतो आहे. वर्ष उलटले तरी जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय पूर्णपणे सावरू शकले नाहीत. अकोला येथील एमआयडीसीतील डाळ मील, ऑईल मिल व इतर ४००च्या जवळपास उद्योग आजही ५० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. त्यामुळे अनेक मजुरांच्या हाताला काम नाही. पुन्हा टाळेबंदी झाल्यास पक्क्या मालाचे खरेदीदार मिळणार नाहीत. परिणामी आहे तेही उद्योग बंद पडून मोठ्याप्रमाणावर रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. मजूर, कामगार यांच्या संयम ठळून मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
............
टाळेबंदी मोडू - ॲड. आंबेडकर
राज्य शासनाने कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी टाळेबंदी करणे हा काही उपाय नाही. टाळेबंदीला आमचा आधीपासूनच विरोध आहे. यावेळी टाळेबंदी केलीच तर ती आम्ही मोडून काढू, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com