esakal | दिवाळीत प्रदूषणाचा स्तर होता कमी
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Pollution levels were low on Diwali

पर्यावरणाबाबत झालेली जागृती, प्रशासनाने जारी केलेली नियमावली, कोरोना विषाणूबाबतची दहशत या कारणांमुळे यंदा दिवाळीच्या कालखंडात गतवर्षीच्या तुलनेने अकाेल्याची हवा गूणवत्ता निर्देशांक मर्यादित होती. दिवाळी होणारे प्रदूषणाचा स्तर कमी असल्याची नोंद झाली आहे.

दिवाळीत प्रदूषणाचा स्तर होता कमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः पर्यावरणाबाबत झालेली जागृती, प्रशासनाने जारी केलेली नियमावली, कोरोना विषाणूबाबतची दहशत या कारणांमुळे यंदा दिवाळीच्या कालखंडात गतवर्षीच्या तुलनेने अकाेल्याची हवा गूणवत्ता निर्देशांक मर्यादित होती. दिवाळी होणारे प्रदूषणाचा स्तर कमी असल्याची नोंद झाली आहे.

गतवर्षी हवेचा निर्देशांक ८६ पीएम (मायक्राेगॅम प्रती क्युबिक मीटर) होता तर यावर्षी ताे ६५ ते ७५ पर्यंत कायम राहिला. राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत फटाका प्रदूषण नियंत्रण करण्‍यासाठी हवेची गुणवत्ता गतवर्षी तपासली हाेती.

त्यानुसार यंदा जिल्ह्यात दिवाळी, छट, नवीन वर्ष ,ख्रिसमसच्या पूर्वसंध्या या उत्सवांच्या वेळेत हरीत फटाक्यांची (इकाे फ्रेंडली- ग्रीन क्रॅकर्स) विक्री- वापर करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आला हाेता.

(संपादन - विवेक मेतकर)