
हिरवा भाजीपाला व फळ भाज्यांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या बटाट्याचे भाव सध्या घाऊक बाजारात कडाडली असून, ६० रुपये प्रति किलो विकल्या जात आहेत.
तेल्हारा (जि.अकोला) : हिरवा भाजीपाला व फळ भाज्यांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या बटाट्याचे भाव सध्या घाऊक बाजारात कडाडली असून, ६० रुपये प्रति किलो विकल्या जात आहेत.
लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याचा वापर झाल्याने आवक घटली आहे. नवा माल येण्यास उशीर असल्याने भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
नेहमीच हिरवा भाजीपाला व फळ भाज्यांच्या तुलनेत बटाट्याचे भाव कमी राहतात साधारणतः ३० ते ३५ रुपये प्रती किलो प्रमाणे बटाट्याचे भाव राहतात हिरवा भाजीपाला फळ भाज्या महागल्या की, बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
पण सद्यस्थितीत बटाट्याची बाजारपेठ बदलण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मार्चपासून कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू झाला. हिरवा भाजीपाला फळभाज्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या म्हणून सर्व लोक काट्यांचा वापर करत असत हा वापर जास्त प्रमाणात असल्याने वर्षातील बटाट्याचे उत्पन्न जवळपास संपत आले.
अकोला येथील मुख्य बाजारपेठेत इंदूर, आग्रा, उत्तर प्रदेशातून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होते; पण सद्यस्थितीत बटाट्याची एवढी मागणी तेवढा पुरवठा पुरवठादार करू शकत नाही. बटाट्याचा पुरवठा जवळपास निम्म्यावर आला. त्या भागामध्ये बटाट्याची लागवड करण्यात आली. मात्र नवीन बटाटा येण्यास काही अवधी आहे. त्यामुळे ठोक बाजारात बटाट्याचे भाव ४५ ते ४८ रुपये प्रती किलो झाले आहेत.
त्यामुळे घाऊक बाजारात वाहतूक खर्च हमाली व इतर खर्च यांचा विचार करता ६० रुपये किलोने विक्री होत आहे. हिरवा भाजीपाला फळभाज्या स्वस्त आहे. तुलनेत बटाटा महाग कधी नव्हे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जोपर्यंत नवीन बटाट्याचा माल येत नाही तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही. भाव जरी कमी झाले नाही तरी, सामान्य ग्राहकांकडून बटाट्याचे मागणी कमी होत नाही. कारण उपवासाला साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे बटाटा भाजी आदिंसाठी बटाट्याची मागणी कायमच राहणार.
सध्या दुकानदारांच्या मागणी एवढा पुरवठा होत नसल्याने व आम्हाला महागभावाने बटाटे खरेदी करावे लागत असल्याने खर्च वजा जाता किलोमागे पाच रुपये नफा म्हणून बटाट्याची विक्री करावी लागते.
- श्याम खाडे, भाजीविक्रेता, तेल्हारा.
गेल्या आठ दिवसापासून बटाट्याचे भाव दिडीने वाढले आहेत पण, दररोजच्या जेवणात हॉटेलमध्ये बटाट्याचा वापर केल्याशिवाय भागत नाही.
-किरण डांगे, हॉटेल व्यावसायिक, तेल्हारा.
(संपादन - विवेक मेतकर)