esakal | दवाखान्यातील पीपीई किट चक्क स्मशानभूमीत पडून
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: PPE kit lying in Shivars cremation ground for two days

महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील युवा सेनेचे माजी उपतालुकाप्रमुख प्रशांत येवले यांचा कोरोनाच्या आजारांचे ता. २० ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम अकोला महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली २१ आॅक्टोंबरला शिवर येथील स्मशानभूमीत पार पडला.

दवाखान्यातील पीपीई किट चक्क स्मशानभूमीत पडून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील युवा सेनेचे माजी उपतालुकाप्रमुख प्रशांत येवले यांचा कोरोनाच्या आजारांचे ता. २० ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम अकोला महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली २१ आॅक्टोंबरला शिवर येथील स्मशानभूमीत पार पडला.

यावेळी वापरण्यात आलेल्या पिपीई किट दोन दिवसांपासून स्मशानभूमीत तशाच पडून होत्या. याच स्मशानभूमीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार यांचे मोठे वडील व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद मुरुमकार यांचे वडील प्रल्हादराव मुरुमकार यांचा सावळण्याचा कार्यक्रम ता. २१ ऑक्टोबरला होता.

पीपीई किट स्मशानभूमीत तशाच पडेल असल्याची बाब शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार यांच्या लक्षात येताच त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता नगरसेवक अनिल मुरुमकार, शिवरचे माजी सरपंच कपिल मुरुमकार, देवानंद मुरुमकार आदींनी सामाजिक बांधिलकी जोपासत किट जाळून टाकुन संपूर्ण परीसरात सॅनिटाईझरची फवारणी केली व नंतर सावळण्याचा कार्यक्रम पार पडला.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार, नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी दाखवीलेल्या सर्तकतेमुळे या परीसरातील मोठा अनर्थ टळला. या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर मनपा प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top