प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप, वीजबील माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवला

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 21 November 2020

राज्यात 50 टक्के वीज बिल माफ होऊ शकते, असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता. पण हा प्रस्ताव राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवला, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

अकोला: राज्यात 50 टक्के वीज बिल माफ होऊ शकते, असा प्रस्ताव वीज कंपन्यांनी दिला होता. पण हा प्रस्ताव राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवला, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

वीज वापरली असेल तर त्याचे बिल भरावेच लागेल या उर्जामंत्री राऊत यांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.

राज्यात वीज बील माफीच्या मुद्दयावरून चांगलेच राजकारण तापले आहे. बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला होता. यासोबतच राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

अकोला येथे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज्याचा कारभार मुख्यमंत्री चालवत आहेत की एखादा मंत्री? याचे उत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावे असे ते म्हणाले. तसेच कुणीही वीज बिल भरू नये. ज्यांची वीज कापली जाईल त्यांची वीज जोडून देण्याची जबाबदारी वंचित घेईल, अशी घोषणा आंबेडकर यांनी यावेळी केली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Prakash Ambedkars sensational allegation that a minister suppressed the companys proposal for electricity bill waiver