
येथिल दिग्रस रोडवर असलेल्या सार्वजनिक उपविभागीय कार्यालया भोवती सांड पाण्याचे डबके साचले आहे. पण्याल्या दुर्गंधि येत आहे.डास झाले आहेत.त्यामुळे शहारालगत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयाला दोन्ही बाजूंनी साड पाणी साचले आहे
मानोरा (जि.वाशीम) : येथिल दिग्रस रोडवर असलेल्या सार्वजनिक उपविभागीय कार्यालया भोवती सांड पाण्याचे डबके साचले आहे. पण्याल्या दुर्गंधि येत आहे.डास झाले आहेत.त्यामुळे शहारालगत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयाला दोन्ही बाजूंनी साड पाणी साचले आहे
त्यामुळे वस्तीत राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे या विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
या विभागातील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहे संपूर्ण तालुक्यातील बांधकाम असो, सभागृह,नाली, इमारत याची देखभाल व नवीन बांधकाम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते.
परंतु त्याच विभागाच्या कार्यलया समोर मोठ्या प्रमाणात साड पाणी साचले आहे याला जबाबदार कोण असे बोलल्या जात आहे मानोरा ते दिग्रस रोडचे काम सुरु असल्याने नाली बांधकाम सुरु आहे. ती कामे पूर्ण केली नाही.
ती नाली कधी पूर्ण करण्यात येईल व नागरिकांना त्या घाणी पासून सुटका मिळेल .गावातील सांड पाणी रस्त्यावर वाहत आहे. याकडे सम्बंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांत होत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)