esakal | कनेक्टिविटी अभावी नोंदणीची कामे रेंगाळली, दुय्यम निबंधकांकडे नोंदणीसाठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Registration lingers due to lack of connectivity, registration for secondary registrar

 बीएसएनएल ब्रॉडबँड सुविधा वारंवार कोलमडत असल्याने ऑनलाइन नोंदणी सह बँकिंगचे व्यवहार प्रभावित होत आहे. दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक 1 कार्यालयात नोंदणीची प्रकरणे रेंगाळत असल्याने तालुकाभरातील खरेदीदार, त्रस्त झाले आहे.

कनेक्टिविटी अभावी नोंदणीची कामे रेंगाळली, दुय्यम निबंधकांकडे नोंदणीसाठी गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : बीएसएनएल ब्रॉडबँड सुविधा वारंवार कोलमडत असल्याने ऑनलाइन नोंदणी सह बँकिंगचे व्यवहार प्रभावित होत आहे. दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक 1 कार्यालयात नोंदणीची प्रकरणे रेंगाळत असल्याने तालुकाभरातील खरेदीदार, त्रस्त झाले आहे.

शेतीच्या खरेदी-विक्री साठी आलेल्या शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बीएसएनएल विभागाने आपली सेवा सुरळीत करावी अन्यथा शासनाने खाजगी ब्रॉडबँड सुविधा वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.


येथील दुय्यम निबंध श्रेणी-1 कार्यालयात जमिनीच्या खरेदीखत, गहाणखत व नोंदणी साठी दररोज तालुका भरातून शेतकरी व खरेदीदार नागरिक येत असतात. दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ऑनलाइन चालत असल्याने कनेक्टिव्हिटी शिवाय कामे मार्गी लागत नाही. सदर कार्यालयासह शहरातील नॅशनॅलिस्ट बँकिंगचे व्यवहार दूरसंचार विभाग म्हणजे बीएसएनएल ब्रॉडबँड सुविधे वर अवलंबून आहे.

मात्र, बीएसएनएल ब्रॉडबँड सुविधा वारंवार कोलमडत असून अलीकडील काळात लिंक अथवा कनेक्टिविटी ठप्प पडल्याने बँकिंग आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील जमिनीच्या नोंदणीची कामे ठप्प होत आहे. तालुक्याचा व्यास मोठा असल्याने अनेक शेतकरी व खरीददार यांना 40 ते 50 किलोमीटर अंतरावरून शहरात यावे लागते. कनेक्टिविटी नसल्याने सदर कार्यालया माफत कामे करून घेण्यासाठी वारंवार पायपीट करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे. परिणामी शेतकरी व जमीन खरेदीदारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बीएसएनएल ब्रॉडबँड मध्ये वारंवार बिघाड होणे, महामार्ग आणि समृद्धी मार्गाच्या खोदकामामुळे जमिनीत पुरलेल्या वायरिंगची तूटफूट होत असल्याने दोन ते तीन दिवस कनेक्टिविटी मिळत नाही. एखाद्या वेळी लिंक फेल होते अशा विविध समस्या उद्भवणे आता नित्यनेमाचे झाले आहे.

वारंवार कनेक्टिविटी नसल्याने बँकिंगसह दुय्यम निबंधक कार्यालयातील कामे ठप्प पडत आहे. परिणामी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत असून शासनाचा महसूल प्रभावित होत आहे. याबरोबर अधिकारी व कर्मचार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. दूरसंचार विभागाने आपली बीएसएनएल सुविधा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे तर वारंवार होणारा त्रास टाळण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका व शासकीय कार्यालयात सॅटेलाइट खाजगी ब्रॉडबँड सुविधा वापरण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी होत आहे.

नोंदणी विभागाची ची सर्व कामे ऑनलाइन असल्याने कनेक्टिविटी अभावी कामे ठप्प होत आहे. याचबरोबर लिंक फेल पडल्याने नोंदणीची कामे प्रभावित होत आहे. खासगी सॅटेलाइट ब्रॉडबँड सुविधा वापरण्याची परवानगी मिळावी म्हणून वरिष्ठांकडे विनंती केली आहे.
- एच. एम. मिर्झा, दुय्यम निबंधक, देऊळगाव राजा.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image