चाैकशी अहवालाचा ठपका, विद्यार्थ्यांना भाैतिक सुविधा अपुऱ्या; रॅम्पही नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

रिंग रोड, केशवनगर येथील एमराल्ड हाईट्स स्कूलमध्ये निकषानुसार सुविधा अपुऱ्या आहेत. अशा प्रकारचा ठपका त्रयस्थ चाैकशी समितीने अहवालात ठेवला आहे. हा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर करण्यात आला आहे.

अकोला  :   रिंग रोड, केशवनगर येथील एमराल्ड हाईट्स स्कूलमध्ये निकषानुसार सुविधा अपुऱ्या आहेत. अशा प्रकारचा ठपका त्रयस्थ चाैकशी समितीने अहवालात ठेवला आहे. हा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर करण्यात आला आहे.

स्थानिक एमराल्ड हाईट्स स्कूलबाबत पालकांनी प्रशासनाकडे तक्रार केली हाेती. त्यानंतर या तक्रारीनुसार जि.प.च्या शिक्षण विभागाने प्राथमिक चाैकशीसाठी समिती स्थापन केली हाेती. या समितीने पालक, शाळेच्या मुख्याध्यापिकांशीही चर्चा करुन शाळेची पाहणीही केली हाेती. त्यानंतर समितीने शिक्षण विभागाला अहवाल सादर केला.

अहवालात स्कूलमध्ये आढळून आलेल्या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला हाेता. दरम्यान नंतर पुन्हा त्रयस्थ समितीचे गठण करण्यात आले. यात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश हाेता.

सदर समितीने शाळेतील एकूण तीन मजले असून ३ शाैचायले आणि ९ मुताऱ्या असल्याचे सांगत सदर सुविधा निकषानुसार अपुऱ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. याव्यतिरीक्त विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शाैचालये आणि रॅम्पही नसल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.

अहवालात नमूद करण्यात अाले. स्टेट बाेर्डाची मान्यता असतानाही सीबीएसई पॅटर्नवर अाधारित खासगी प्रशासनाची पुस्तके, वह्या, गणेशाची िवक्री शाळेतूनच हाेते असल्याचे िदसून अाले, असेही अहवालात म्हटले हाेते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Reprimand for report with check, inadequate physical facilities for students; No ramps either