esakal | गारठा वाढला; किमान तापमान ९.६ अंश सेल्सियस, दिवसाही जाणवतो थंडीचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rising cold; The minimum temperature is 9.6 degrees Celsius

 शहर आणि परिसरात गत काही दिवसांपासून पारा घसरला आहे. त्यामुळे अकोलेकरांना ठंंडीची चाहूल लागली असून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहराचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले.

गारठा वाढला; किमान तापमान ९.६ अंश सेल्सियस, दिवसाही जाणवतो थंडीचा परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  शहर आणि परिसरात गत काही दिवसांपासून पारा घसरला आहे. त्यामुळे अकोलेकरांना ठंंडीची चाहूल लागली असून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहराचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले.

पुढील काही दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांना यंदा अधिक हुडहुडीचा सामाना करावा लागेल असे चित्र आहे.

राज्यातील ‘हॉट’ शहरांमध्ये अकोला शहराचा उल्लेख करण्यात येतो. उन्हाळ्यात जिल्ह्याचे तपामान ४५ अंश सेल्सियसवर जावून पोहचते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना दिवसा कडाक्याच्या सूर्य किरणांचा व रात्रीच्या वेळी गर्मीचा सामना करावा लागतो. दरम्यान उष्ण शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोला शहरातील नागरिकांना आता गत काही दिवासांपासून हुडहुडीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या तापमानात गत काही दिवसांपासून अचानक घट होत असल्याने थंडी वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान येणाऱ्या काही दिवसांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडी पासून रक्षण करत कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी लागणार आहे.


यामुळे वाढळी हुडहुडी
कोरडे हवामान आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामध्ये किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी वाढल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाख व परिसरात व उत्तर पाकिस्तान व परिसरात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. दरम्यान राज्यातही उत्तेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा वाहू लागले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत चांगलाच गारठा वाढला असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे.

किमान तापमावर दृष्टीक्षेप (अंश सेल्सियस मध्ये)
तारीख किमान
१२ १९.४
१३ १९.१
१४ १९.७
१५ १७.६
१६ १७.५
१७ १५.६
१८ १४.८
१९ १२.६
२० ०९.६

(संपादन - विवेक मेतकर)