‘माझी वसुंधरा’ अभियानतून नगर परिषद करणार रिसोड ग्रीनसिटी

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 16 December 2020

पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यात वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत शहर हे संपूर्ण हिरवेगार करण्याच्या उद्देशाने शहर परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाला चालना मिळावी याकरिता स्थानिक नगर परिषद व समता फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. केवळ वृक्ष लागवड न करता वृक्षांचे संवर्धन व्हावे या हेतूने शहरात रोपवाटिका साकारण्यात येत आहे.

रिसोड (जि.वाशीम)  : पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यात वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत शहर हे संपूर्ण हिरवेगार करण्याच्या उद्देशाने शहर परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाला चालना मिळावी याकरिता स्थानिक नगर परिषद व समता फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. केवळ वृक्ष लागवड न करता वृक्षांचे संवर्धन व्हावे या हेतूने शहरात रोपवाटिका साकारण्यात येत आहे.

नगरपरिषद व समता फाउंडेशन यांच्या वतीने रिसोड शहरात रोपवाटिका साकारत असून, वृक्ष संवर्धनाची हमी घेणाऱ्यांना मोफत रोपाचे वितरण केले जाणार आहे. रोपवाटिकेत लिंबू, आंबा, वड, पिंपळ, पेरू, पपई, अंजिर, उंबर व विविध प्रजातींच्या फळांची रोपे तयार केली जाणार आहेत. या रोपवाटिकेतून रोपांचे वितरण हे मोफत केले जाणार असून, रोपे नेण्यापूर्वी रोपांचे संवर्धन करण्याची हमी द्यावी लागणार आहे.

लागवड केलेले रोप जगवेल, तसेच त्याचे योग्य पद्धतीने पालनपोषण करेल अशी शपथ संबंधिताला घ्यावी लागणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा व माझी वसुंधरा अभियानतून रिसोड ग्रीनसिटी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले.

वृक्ष संगोपनाची द्यावी लागणार शपथ
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषद आणि समता फाउंडेशन द्वारे शहरात २५ हजार रोपांची नर्सरी तयार होत आहे. विविध प्रजातींची फळझडे, लिंब, आंबा, वड, पिंपळ, पेरू इत्यादी रोपे नागरिकांना मोफत मिळणार आहेत. रोप नेताना फक्त ते मी जगवेल आणि पूर्ण पालन पोषण करेल अशी शपथ घ्यावी लागणार.

शहरातील नागरिकांना जातिवंत व दर्जेदार वृक्ष लागवडी करिता नोंदणी करणे आवश्यक आहे. येत्या जून-जुलैमध्ये उत्तम दर्जाचे रोप शहरवासीयांना मोफत दिल्या जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, रिसोड.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Risod Green City will be run by the city council through my Vasundhara Abhiyan