रस्ता अपूर्ण, अभियंत्याच्या खुर्चीला बेशरमचा बुके

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 10 October 2020

 शहरातील रस्त्यांची अर्धवट कामे नागरिकांना त्रस्त करीत आहे. त्यातच सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने बाजारापेठांमध्ये गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत मुख्य बाजारपेठे कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या दिला. त्यांची कैफिय ऐकण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालयात न आल्याने अभियंत्याच्या खुर्चीलाच बेशरमचा बुके देवून निषेध नोंदविण्यात आला.

अकोला : शहरातील रस्त्यांची अर्धवट कामे नागरिकांना त्रस्त करीत आहे. त्यातच सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने बाजारापेठांमध्ये गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत मुख्य बाजारपेठे कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या दिला. त्यांची कैफिय ऐकण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालयात न आल्याने अभियंत्याच्या खुर्चीलाच बेशरमचा बुके देवून निषेध नोंदविण्यात आला.

अकोला महानगरपालिका हद्दीतील टिळक रोडचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जात आहे. सिटी कोतवाली ते शिवाजी पार्कपर्यंत असलेला हा रस्ता दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या या रस्त्यावर मामा बेकरी ते अकोट स्टँडपर्यंत डिवाइडरचे अद्याप झाले नाही.

अकोट सँड ते शिवाजी पार्कपर्यंत रास्ता एकतर्फी झाला आहे. दुसऱ्या बाजूचे काम ठप्प आहे. हा रस्ता वरदळीचा असल्याने आणि या मार्गावरून जड वाहणांची वाहूक होत असल्याने किरकोळ अपघात रोजच होतात.या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेण्यासाठी कार्यालय गाठले.

मात्र त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी कोणीही कार्यालयात नसल्याने कार्यकर्त्यांनी अभियंत्याच्या दालनातच ठिय्या दिला. प्रतीक्षा करूनही कुणी फिरकले नाही. त्यामुळे बेशरमच्या झाड्याचा बुके अभियंत्याच्या खुर्चीला भेट देवून रोष व्यक्त करण्यात आला. काम सुरू करण्यासाठी तीन दिवसांची मुदतही विभागाला देण्यात आली.

या संदर्भातील निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नावे देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बुढन गाडेकर, देवानंद ताले, युवक कार्याध्यक्ष रवी गीते, अजय मते, तालुका विद्यार्थी अध्यक्ष शुभम पिठलोड, संदीप तायडे, मोहम्मद फिरोज, हाजी अतिकोद्दिन काजी, आगा खान पठान, शुभम सिरसाठ, तेजस निचल आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Road unfinished, shameless bouquet on engineers chair