esakal | पर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जारी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rules issued for passengers coming to the district from other states

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून अकोला जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एक आदेशाद्वारे नियमावली जारी केली आहे. सदर नियमांचे पालन पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना करावे लागेल.

पर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून अकोला जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एक आदेशाद्वारे नियमावली जारी केली आहे. सदर नियमांचे पालन पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना करावे लागेल.

दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांना तालुकास्तरीय नियंत्रण कक्षात व महापालीका क्षेत्रात महापालिका येथील नियंत्रण कक्षात माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न देणाऱ्या प्रवाशांवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी झालेली नसल्यास त्याच्या तपासणीची व्यवस्था जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून करण्यात यावी.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

या चार राज्यात आलेल्या प्रवाशाची माहिती रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक राहिल. कोविड-१९ चे अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच निर्गमित केलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

रेल्वे प्रवाशांसाठी नियमावली
दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यातून अकोला जिल्ह्यात रेल्वेव्दारे येणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहिल. रेल्वेने महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या ९६ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी करीता नमुने घेण्यात यावेत. ज्या प्रवाशांना चाचणी केल्याबाबतचा अहवाल नसेल अशा प्रवाशांची स्क्रिनिंग करून तापमान मोजण्यात यावे. याबाबतची जवाबदारी रेल्वे विभागाची राहिल. लक्षणे असलेल्या प्रवाशाना विलगीकरण करण्यात यावे किंवा गृह अलगीकरण करण्यात यावे व त्यांची ॲंटिजेन चाचणी करण्यात यावी.

हेही वाचा - सराफा दुकानातील नोकराने दुकानासमोरच घेतला गळफास!

रस्ते प्रवाशांसाठी नियमावली
संबंधिर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करून तापमान मोजण्याकरीता संबंधित तहसीलदार तथा इंसीडेट कमांडर, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद याचे पथकांनी सदर बाबतीत संपूर्ण नियोजन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या प्रवाशाना लक्षणे आहेत अशा प्रवाशांना परत माघारी जाण्याचा पर्याय असेल. वरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक राहिल.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image