साहेब, बंद पडलेल्या सॅनिटायझर मशीनचं काय करायचं?

गजानन काळुसे
Thursday, 12 November 2020

तहसील कार्यालयात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांना हात स्वच्छ धुण्यासाठी तत्कालीन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 
हॅन्ड सॅनिटायझर मशीन कार्यालयांच्या समोरील बाजूला बसविली होती.

सिंदखेड राजा: तहसील कार्यालयात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांना हात स्वच्छ धुण्यासाठी तत्कालीन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 
हॅन्ड सॅनिटायझर मशीन कार्यालयांच्या समोरील बाजूला बसविली होती.

त्यानंतर डॉ.संतोष येवलीकर यांच्या काळखंडात हॅन्ड सॅनिटायझर मशीन सुव्यवस्थीत व नेहमीत सुरू होती,त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी व तहसिल मध्ये कामासाठी येणारे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी स्वतःचे हात निर्जंतुक करण्यात फायदा होत होता.परंतु त्यानंतर तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांची बदली अकोला येथे झाल्यानंतर नवीन तहसीलदार सुनील सावंत यांनी नियुक्ती करण्यात आली..

तहसीलदार सुनील सावंत यांनी पदभार घेतल्यानंतर तहसीलदार यांच्या कॅबिन समोर बसविण्यात आलेल्या हॅन्ड सॅनिटायझर मशीनकडे तहसील प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्यामुळे कोरोनाचे गांभीर्य तहसील यंत्रणेला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही महिन्याअगोदर तहसील कार्यालयातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे तहसील कार्यालय काही दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर तहसील कार्यालय सुरळीत सुरू झाले,

त्यानंतर काही दिवस हॅन्ड सॅनिटायझर मशीन  व्यवस्थित सुरू होती,तहसिल कर्मचारी व तहसील मध्ये येणारे नागरीक हॅन्ड सॅनिटायझर मशीन चा उपयोग करून हात निर्जंतुकीकरण करत होते.परंतु मागील एक महिन्यापासून हॅन्ड सॅनिटायझर मशीन बंद अवस्थेत आहे..तहसील कार्यालयामध्ये दररोज शेकडो नागरीक कामसाठी येत असतात. त्यामुळे तहसिल कार्यालयातील हॅन्ड सॅनिटायझर मशीन सुरू करण्याची मागणी होत आहे.]

तहसीलदारांच्या हॅन्ड सॅनिटायझर मशीन समोरून
तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आलेल्या हॅन्ड सॅनिटायझर मशीन हे तहसीलदार सुनील सावंत यांच्या केबिन समोरच लावण्यात आलेले आहे. त्यामुळे तहसीलदार यांना दररोज हॅन्ड सॅनिटायझर मशीन समोरूनच जावे त्यामुळे तहसीलदाराना बंद अवस्थेत असलेली हॅन्ड सॅनिटायझर मशीन  खरंच दिसत नाही काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लक्ष देवून हॅन्ड सॅनिटायझर मशीन  सुरू करण्याची मागणी होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sanitizer machine in tehsil office fell off