
लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी २४ तास राबणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेवून त्या सोडविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पुढाकाराने ‘समाधान’ योजना राबविली जात आहे.
अकोला ः लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी २४ तास राबणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेवून त्या सोडविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पुढाकाराने ‘समाधान’ योजना राबविली जात आहे. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात प्रशासकीय स्तरावरील समस्यांचाही समावेश असतो. त्या सोडवून घेण्यासाठी प्रत्येकवेळी पोलिस अधीक्षकांना भेट शक्य होईल, असे नाही. पोलिस अधीक्षकांनाही कामाचा व्याप बघता प्रत्येकवेळी पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांची भेट घेणे शक्य होत नाही. या अडचणी बघता व पोलिसांच्या समस्या तातडीने वेळीच सोडविण्यासाठी पोलिस महासंचालकांनी राज्यात पाच वर्षांपूर्वी समाधान योजना राबविण्यास सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी सर्वच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी करणे आवश्यक होते. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात यंत्रणाही उभी करण्यात आली. मात्र त्याचा उपयोगच होत नव्हता.अकोला जिल्ह्यात नव्याने रूजू झालेले पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बीड येथे असताना ही योजना कार्यान्वित केली होती. अकोल्यात रूजू झाल्यानंतरही त्यांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने सोडविता याव्यात म्हणून समाधान योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कुठे मांडता येतील समस्या?
जिल्ह्यात प्रथमच अंमलबजावणी डीजी ऑफिसतर्फे पाच वर्षांपूर्वी समाधान योजना सुरू करण्यात आली होती. बीड येथे असताना ही योजना मी राबविली. अकोल्यातही या योजनेची यंत्रणा होती. ती मी आल्यानंतर कार्यान्वित केली आहे. आठवड्यातून एकदा मी स्वतः त्याचा आढावा घेतो व तक्रारी निकाली काढून पोलिसांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||